मुंबई

ई-झोनमधील रसायनयुक्त पाण्यावर तातडीची कारवाई

CD

ई-झोनमधील रसायनयुक्त पाण्यावर तातडीची कारवाई
‘सकाळ’च्या वृत्तानंतर प्रशासनाची हालचाल

बोईसर, ता. २३ (वार्ताहर) : तारापूर औद्योगिक क्षेत्र येथील ई-झोन परिसरात गटारामार्गे वाहणाऱ्या रसायनयुक्त सांडपाण्यामुळे निर्माण झालेल्या गंभीर परिस्थितीची ‘सकाळ’मध्ये प्रसिद्ध झालेल्या वृत्ताची संबंधित यंत्रणांनी दखल घेत तातडीने उपाययोजना केल्या आहेत. परिणामी रस्त्यावर साचलेले केमिकलयुक्त पाणी कमी झाले असून, तुडुंब भरलेली गटारे व बंद कारखान्यात साचलेले पाणी आता सुकल्याचे दिसून येत आहे.
ई-झोन परिसरातील काही कारखान्यांतून निघणारे रसायनयुक्त सांडपाणी नियमांनुसार प्रक्रिया करून चेंबरद्वारे सीईटीपीकडे पाठवणे बंधनकारक आहे. मात्र, हे पाणी थेट गटारांमध्ये सोडण्यात येत असल्याने ही गटारे तुडुंब भरून रसायनयुक्त पाणी रस्त्यावर वाहत होते. त्यामुळे नागरिक, कामगार व वाहनचालकांना दुर्गंधी व आरोग्याच्या तक्रारींना सामोरे जावे लागत होते. तसेच जमीन व भूजल प्रदूषणाचा धोका वाढल्याची भीती व्यक्त केली जात होती.
सकाळमध्ये वृत्त प्रसिद्ध झाल्यानंतर संबंधित विभागाने पाहणी करून गटारींची स्वच्छता, साचलेले रसायन काढणे आणि पाण्याचा निचरा सुरळीत करण्यासाठी उपाययोजना केल्या. सध्या परिसरातील परिस्थितीत सुधारणा झाल्याचे स्थानिकांनी सांगितले.
दरम्यान, या रसायनयुक्त पाण्यास जबाबदार कंपनीचा शोध घेऊन संबंधितांवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी होत आहे. महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ व महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ यांनी संयुक्त तपासणी करून दोषींवर कारवाई करावी, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.

-------------
चौकट

बातमीचा प्रभाव; पण मोठा प्रश्न अनुत्तरित!
‘सकाळ’च्या वृत्तानंतर रस्त्यावरचा घनकचरा व केमिकलयुक्त पाणी तातडीने हटवले. संबंधित जागा पूर्णपणे कोरडी करण्यात आली. मात्र, सांडपाणी नेमक्या कोणत्या कंपनीतून सोडण्यात आले होते, याचा अद्याप खुलासा झाला नाही. तसेच चौकशी व दोषींवर कारवाई कधी होणार, असा प्रश्नही नागरिक उपस्थित करत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

केंद्रीय सरकारी कर्मचाऱ्यांसाठी मोठी बातमी, महागाई भत्त्यात वाढ करण्याचा निर्णय

America-Israel War: आता लास्ट.. बुधवारपर्यंत ऐकलं नाही तर...; ट्रम्प यांचा इराणला आणखी एक अल्टिमेटम

Latest Marathi News Live Update: अमरावतीत न्यायालयासमोर वकिलाला महिलांकडून मारहाण

Sangli Politics : सांगली महापालिकेत भाजप-काँग्रेसचं धक्कातंत्र! पराभूत उमेदवारांना दिली संधी, निष्ठावंतांचा पत्ता केला कट, यादीत अनेक अनपेक्षित नावे

Solapur Police Raid Orchestra Bars : एकाच रात्री 3 ऑर्केस्ट्रा बारवर पोलिसांचे छापे; महिलांसह 91 संशयितांवर गुन्हे दाखल; 1.21 कोटी रुपयांचा मुद्देमाल जप्त

SCROLL FOR NEXT