मुंबई

मुलुंड मेट्रो दुर्घटना : दोषींवर त्वरित कारवाईची मागणी

CD

मुलुंड मेट्रो दुर्घटना : दोषींवर त्वरित कारवाईची मागणी
मुलुंड, ता. २३ (बातमीदार) : मुलुंड येथील एल.बी.एस. रोडवरील मेट्रो मार्ग क्रमांक ४च्या उड्डाणपुलावर झालेल्या भीषण दुर्घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे. काँक्रीट संरक्षक भिंत कोसळून एका नागरिकाचा दुर्दैवी मृत्यू झाला, तर दोन जखमी रुग्ण अतिदक्षता विभागात उपचार घेत असून, त्यांची प्रकृती चिंताजनक आहे. याप्रकरणी उपकंत्राटदार कंपनीतील काही कर्मचारी तसेच पर्यवेक्षण संस्थेतील संबंधितांना अटक करण्यात आल्याची माहिती आहे.
दरम्यान, केवळ काही कर्मचाऱ्यांवर कारवाई करून प्रकरण दडपण्याचा प्रयत्न होत असल्याचा आरोप करत भारतीय राष्ट्रीय काँग्रेसने आक्रमक भूमिका घेतली आहे. पक्षाचे प्रवक्ते राकेश शेट्टी यांनी शनिवारी (ता. २१) मुलुंड पोलिस ठाणे येथे भेट देऊन लेखी निवेदन सादर केले. निवेदनात प्रकल्पाचे नियोजन, सुरक्षा व्यवस्था, कामाचा दर्जा आणि अंतिम निर्णय प्रक्रियेस जबाबदार वरिष्ठ अधिकाऱ्यांवर अद्याप कारवाई का करण्यात आलेली नाही, असा सवाल उपस्थित करण्यात आला आहे. संबंधितांच्या निष्काळजीमुळेच ही दुर्घटना घडल्याचा आरोप करत त्यांच्यावर तत्काळ कठोर कारवाई करावी, अशी मागणी करण्यात आली आहे. तसेच जबाबदार अधिकाऱ्यांची नावे प्रथम माहिती अहवालात समाविष्ट करून त्यांना त्वरित अटक करावी, अशी ठाम मागणी काँग्रेसकडून करण्यात आली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bhaskar Jadhav: 'कुठेतरी घातपात झालाय, असंच वाटतंय'! अजितदादांच्या विमान अपघातावर भास्कर जाधव महत्वाचे बोलले

Stock Market Today: शेअर बाजार तेजीत बंद! मात्र IDFC First Bank आणि TCS ला मोठा धक्का; कोणते शेअर्स तेजीत?

Crime: भयंकर! फक्त ३० सेकंद, २७ वेळा चाकूने वार अन्...; अल्पवयीन तरुणांचं दहावीच्या विद्यार्थ्यासोबत क्रूर कृत्य, कारण काय?

Malegaon News : मालेगावचा पाणी अहवाल समोर! वर्षभरात २ हजार नमुन्यांची तपासणी, ८२ ठिकाणी आढळले दूषित पाणी

Latest Marathi News Live Update : लातूरच्या पोहरेगाव परिसरात गारांचा पाऊस, शेती पिकांचे मोठं नुकसान

SCROLL FOR NEXT