मुंबई

मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर प्रोपोलीन गॅस टॅंकरचा अपघात

CD

प्रोपोलीन गॅस टॅंकरचा अपघात
सुदैवाने मोठी दुर्घटना टळली

खालापूर, ता. २३ (बातमीदार) ः मुंबई पुणे द्रुतगती मार्गावरील गॅसगळती दुर्घटनेची पुनरावृत्ती सोमवारी (ता. २३) सकाळी टळली असून, अनियंत्रित झालेला प्रोपोलीन गॅस वाहक टँकरचा ब्रेक निकामी झाल्याने टँकर लेन सोडून लगतच्या डोंगरावर आदळला. सुदैवाने टँकरचा टाकीचा भाग सुरक्षित राहिल्याने गॅसगळती झाली नाही.

सोमवारी (ता. २३) सकाळी १० वाजण्याच्या सुमारास पुण्याहून मुंबईच्या दिशेने जाणारा टँकर अमृतांजन पुलाजवळ आला असताना वळणावर टँकरचे ब्रेक निकामी झाल्याचे चालकाच्या लक्षात आले. चालकाने टँकर शोल्डर मेनमध्ये घेऊन नियंत्रित करण्याचा प्रयत्न केला, परंतु यादरम्यान टँकर डोंगराला धडकला. अपघाताची माहिती मिळतात बोरघाट पोलिस, देवदूत यंत्रणा, खोपोली पोलिस निरीक्षक सचिन हिरे तातडीने घटनास्थळी पोहोचले. अपघातग्रस्त टँकर तातडीने क्रेनच्या साह्याने बाजूला करून सुरक्षित जागी हलवण्यात आला. अपघातग्रस्त टँकरचालकावर गुन्हा दाखल करण्यात आला असून, कोणत्याही प्रकारची गळती नसून टँकर सुरक्षित जागी हलवण्यात आला असल्याची माहिती खोपोलीचे पोलिस निरीक्षक सचिन हिरे यांनी दिली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

T20 WC, IND vs SA: गौतम गंभीर काय करतोय, माहित नाही; शुभमन गिलसोबतही असंच केलं..., विश्वविजेता खेळाडू भडकला

Double Decker Bus Accident : भीषण दुर्घटना! डबलडेकर बस उलटली; पाच जणांचा मृत्यू ,१६ जण गंभीर जखमी

Latest Marathi News Live Update : ओडिशातील कंधमाल जिल्ह्यात सुरक्षा दलांसोबत झालेल्या चकमकीत दोन माओवादी ठार

Weather Update: दिवसा उन्हाचे चटके, रात्री बोचरा उकाडा; तापमान बदलामुळे सर्दी-खोकल्याचे रुग्ण वाढले

Manchar News : आंबेगाव तालुका मराठी पत्रकार संघाला ‘वसंतराव काणे आदर्श’ पुरस्कार

SCROLL FOR NEXT