मुंबई

जिल्हा परिषद शाळा राहनाळ येथे माजी विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त स्नेहमेळावा

CD

जिल्हा परिषद शाळेत भरला माजी विद्यार्थ्यांचा वर्ग
कल्याण, ता. २३ (वार्ताहर) : राहनाळ येथील जिल्हा परिषद केंद्र शाळेत माजी विद्यार्थ्यांचा स्नेहमेळावा उत्साहात पार पडला. या शाळेत पुन्हा एकदा विद्यार्थ्यांची शाळा भरली, घंटा वाजली आणि पाहता पाहता वय वर्ष ८५ पासून ते १५-२० वर्षांपर्यंतचे माजी विद्यार्थी शाळेच्या प्रांगणात जमा झाले. प्रार्थना, राष्ट्रगीत, सुविचार आणि दिनविशेष यांचा आनंद घेत सर्वांनी आपल्या बालपणीच्या आठवणींना उजाळा दिला.
या स्नेहमेळाव्याचे आयोजन विद्यार्थी सुरक्षा समिती व भौतिक विकास समितीचे अध्यक्ष प्रताप पाटील, माजी विद्यार्थी संघाचे अध्यक्ष तुकाराम मढवी, महिला तक्रार निवारण समिती अध्यक्षा प्रियांका पाटील, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्षा रजनी नाईक आणि शाळेचे मुख्याध्यापक अजय पाटील यांच्या संकल्पनेतून करण्यात आले होते. या मेळाव्याला सुमारे ३०० हून अधिक माजी विद्यार्थ्यांनी उपस्थिती लावली. कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून माजी सरपंच राजेंद्र मढवी आणि ग्रामविकास अधिकारी गणेश पडवळ उपस्थित होते.
आपापल्या क्षेत्रात यश संपादन केलेल्या अनेक माजी विद्यार्थ्यांनी मनोगत व्यक्त करत शाळेप्रती कृतज्ञता व्यक्त केली. तंटामुक्ती समितीचे अध्यक्ष तथा आगरी समाज उन्नती मंडळाचे अध्यक्ष नामदेव पाटील यांनी, याच शाळेत मी कबड्डी शिकलो, दंगामस्ती केली; परंतु शिक्षकांच्या शिस्तीमुळेच आयुष्यात सुधारलो, असे सांगितले. माजी सरपंच अविनाश पाटील यांनी मित्र-मैत्रिणींच्या आठवणींना उजाळा दिला. रविकांत पाटील यांनी मनोगत व्यक्त करताना सांगितले, राहनाळ शाळेने मला खूप काही दिले आहे. त्या काळातील शिक्षकांची शिस्त आजही आठवते.
मुख्याध्यापक अजय पाटील यांनी स्थानिक पालकांना आपल्या मुलांचा प्रवेश राहनाळ शाळेत घेण्याचे आवाहन करत, स्वावलंबन, शिस्त आणि गुणवत्तापूर्ण शिक्षणासाठी ही शाळा कटिबद्ध आहे, असे सांगितले. कार्यक्रमादरम्यान माजी विद्यार्थ्यांचा पुष्पगुच्छ देऊन सन्मान करण्यात आला. माजी प्रभारी सरपंच शिवनाथ भोईर यांनी कविता सादर करून कार्यक्रमात रंग भरले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

TCS Nashik case: टीसीएस नाशिकमध्ये खळबळ! धर्मांतरण-छळ आरोपांमुळे ऑफिस बंद, आंतरराष्ट्रीय संबंधांच्या संशयावरून तपास तीव्र

RCB vs LSG Live: विराट कोहलीच्या बाबतीत २ गोष्टी आज पहिल्यांदाच घडल्या... बंगळुरूची IPL 2026 Point Table मध्ये मोठी उलथापालथ

Pune DSK Vishw News: जीबीएसचा धोका कमी करण्यासाठी महापालिकेचा निर्णय; डीएसके विश्वला पावसाळ्यापूर्वी शुद्ध पाणीपुरवठा

Viral Video : हे, पाकिस्तानातच घडू शकतं... Run Out साठी खेळाडू चेंडू थ्रो करायचं सोडून घेऊन पळत सुटला... पोरीही हसल्या...

India AI : ओपनएआय अहवालात भारत आघाडीवर; एआयचा वापर चारपट वाढला, शहरांमध्ये टेक क्रांतीची लाटआघाडीवर...

SCROLL FOR NEXT