मुंबई

महसूल विभाग थेट जनतेच्या दारी

CD

महसूल विभाग थेट जनतेच्या दारी
ठाण्यात ‘महाराजस्व समाधान शिबिर’
सकाळ वृत्तसेवा
ठाणे, ता. २३ : नागरिक, शेतकरी, महिला आणि विद्यार्थ्यांच्या महसूलविषयक तक्रारी आणि प्रलंबित कामे जलद गतीने निकाली काढण्यासाठी राज्य शासनाने सुरू केलेल्या ‘छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिर’ अभियानाचा पहिला टप्पा आता ठाणे जिल्ह्यातही राबविण्यात येणार आहे. महसूल प्रशासन अधिक लोकाभिमुख आणि गतिमान करण्याच्या उद्देशाने ही विशेष मोहीम हाती घेण्यात आली आहे.
अभियानांतर्गत १८ ते ५ मार्च या कालावधीत पूर्वतयारी करण्यात येत असून, प्रत्यक्ष शिबिरांना ७ मार्चपासून सुरुवात होणार आहे. प्रत्येक तालुक्यातील मंडळ स्तरावर ही शिबिरे भरविण्यात येणार आहेत. नागरिकांना ‘सिंगल डे सर्व्हिस डिलिव्हरी’च्या माध्यमातून एका दिवसात सेवा देण्यावर भर दिला जाणार आहे. या शिबिरांमध्ये प्रलंबित फेरफार अर्ज निकाली काढणे, ७/१२ उताऱ्यातील चुका दुरुस्त करण्यासाठी विशेष हेल्प डेस्क, उत्पन्न, अधिवास आणि जातीचे दाखले वाटप, डिजिटल स्वाक्षरीयुक्त ७/१२ उताऱ्यांची माहिती व कायदेशीर वैधतेबाबत मार्गदर्शन, जमिनीच्या तुकडेबंदी कायद्यातील सुधारणा याबाबत जनजागृती केली जाणार आहे.

वेळापत्रक जाहीर
मार्च : ७ व १४ - मंडळ स्तर
एप्रिल : १० व १७- मंडळ स्तर
मे : ८ व १५ - नगर परिषद व नगर पंचायत स्तर

एक खिडकी योजना
‘एक खिडकी योजना’ राबवून सर्व महसूल अधिकारी एकाच ठिकाणी उपलब्ध राहतील, अशी व्यवस्था करण्यात येणार आहे. त्यामुळे नागरिकांना विविध कार्यालयांच्या फेऱ्या मारण्याची गरज भासणार नाही. ठाणे जिल्हाधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ आणि निवासी उपजिल्हाधिकारी डॉ. संदीप माने यांनी ठाणेकरांनी या अभियानाचा जास्तीत जास्त लाभ घ्यावा, असे आवाहन केले आहे. महसूलविषयक अडचणी, दाखल्यांसाठीची प्रतीक्षा आणि नोंद दुरुस्तीची कामे या शिबिरांतून तत्काळ मार्गी लावण्याचा प्रयत्न केला जाणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bhaskar Jadhav: 'कुठेतरी घातपात झालाय, असंच वाटतंय'! अजितदादांच्या विमान अपघातावर भास्कर जाधव महत्वाचे बोलले

Stock Market Today: शेअर बाजार तेजीत बंद! मात्र IDFC First Bank आणि TCS ला मोठा धक्का; कोणते शेअर्स तेजीत?

Crime: भयंकर! फक्त ३० सेकंद, २७ वेळा चाकूने वार अन्...; अल्पवयीन तरुणांचं दहावीच्या विद्यार्थ्यासोबत क्रूर कृत्य, कारण काय?

Malegaon News : मालेगावचा पाणी अहवाल समोर! वर्षभरात २ हजार नमुन्यांची तपासणी, ८२ ठिकाणी आढळले दूषित पाणी

Latest Marathi News Live Update : लातूरच्या पोहरेगाव परिसरात गारांचा पाऊस, शेती पिकांचे मोठं नुकसान

SCROLL FOR NEXT