टिटवाळ्यात ‘निसर्गायण’ची हरित क्रांती
सिद्धीविनायकाच्या साक्षीने पर्यावरण शिक्षणाचा भक्कम पाया
टिटवाळा, ता. २३ (वार्ताहर) : ऐतिहासिक आणि आध्यात्मिक ओळख असलेल्या टिटवाळा नगरीत आता ‘हरित क्रांती’चे होणार आहेत. श्री सिद्धीविनायक मंदिराच्या सान्निध्यात, टिटवाळा-रुंदे रस्त्यावर ‘निसर्गायण’ या पर्यावरण शिक्षण प्रकल्पाचे भूमिपूजन गुरुवारी (ता. २६) होणार आहे.
पर्यावरण दक्षता मंडळ आणि एन्व्हायरोव्हीजल यांच्या संयुक्त विद्यमाने हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प आकाराला येत आहे. यामुळे धार्मिक ओळख लाभलेल्या परिसराला हरित दिशादर्शनाचा नवा आयाम लाभणार आहे. आयुक्त अभिनव गोयल, महापौर ॲड. हर्षली चौधरी, उपमहापौर राहुल दामले आणि नगरसेवक संतोष तरे, उपेक्षा भोईर, बंदेश जाधव आणि अमित धाक्रस यांच्या उपस्थितीत हा सोहळा पार पडणार आहे.
वाढत्या नागरीकरणाच्या दडपणाखाली हरवत चाललेली जैवविविधता, पाण्याचे असंतुलित व्यवस्थापन, कचऱ्याचा वाढता बोजा आणि बदलत्या हवामानाचीली झळ या पार्श्वभूमीवर ‘निसर्गायण’ हा प्रकल्प महत्वपूर्ण ठरणार आहे. विद्यार्थ्यांपासून ज्येष्ठ नागरिकांपर्यंत प्रत्येक घटकाला प्रत्यक्ष अनुभवातून पर्यावरणाशी नाते जोडता यावे, यासाठी प्रात्यक्षिक उपक्रम, प्रशिक्षण शिबिरे, परिसंवाद आणि मार्गदर्शन सत्रांची व्यापक रूपरेषा आखली आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.