मुंबई

विठ्ठल रुक्मिणी मंदिर संस्थेतर्फे भाजपा नगरसेविका हेमलता पवार यांचा सत्कार

CD

श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर संस्थेतर्फे हेमलता पवार व नरेंद्र पवार यांचा गौरव
कल्याण, ता. २३ (वार्ताहर) : अखिल देशस्थ दैवज्ञ समाज आणि श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर संस्थेच्या संयुक्त विद्यमाने नवनिर्वाचित भाजप नगरसेविका हेमलता पवार यांचा सत्कार करण्यात आला. तसेच भाजप नेते आणि माजी आमदार नरेंद्र पवार यांचाही यावेळी गौरव करण्यात आला. अध्यक्ष सूर्यकांत बेलेकर, नंदकुमार काकटकर, दामोदर खोलम, मुकुंद निघोळकर यांच्यासह दोन्ही संस्थांचे पदाधिकारी, सदस्य आणि अनेक मान्यवर यावेळी उपस्थित होते.
कल्याण-डोंबिवली पालिकेच्या निवडणुकीत भाजपच्या उमेदवार हेमलता पवार या कल्याण पश्चिमेतील प्रभाग क्रमांक सातमधून मोठ्या मताधिक्याने विजयी झाल्या आहेत. निवडून आल्यानंतर पहिल्या दिवसापासून त्यांनी प्रभागांमध्ये कामाचा सपाटा लावला असून अनेक नागरी समस्या सोडवण्यासाठी पुढाकार घेतला आहे. त्याची दखल घेत अखिल देशस्थ दैवज्ञ समाज आणि श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर संस्थेकडून या सत्कार सोहळ्याचे आयोजन करण्यतॉत आले होते.
नगरसेवकपदी निवडून आल्यानंतर प्रतिष्ठित सामाजिक संस्थांकडून होणारा हा आपला पहिलाच सत्कार सोहळा असल्याचे सांगत नगरसेविका हेमलता पवार यांनी दोन्ही संस्थांबद्दल कृतज्ञता व्यक्त केली. तसेच या सत्कारामुळे आपल्याला काम करण्यासाठी आणखी ऊर्जा मिळाली असून येणाऱ्या काळात आपण आपल्या सामाजिक कामाचा आलेख असाच उंचावत ठेवू असा विश्वासही त्यांनी सत्काराला उत्तर देताना व्यक्त केला.
तर यावेळी भाजप नेते आणि कल्याण पश्चिमेचे माजी आमदार नरेंद्र पवार यांनाही यावेळी दोन्ही संस्थांकडून गौरवण्यात आले

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

RTE Admission Rule : 'आरटीई'चा नवा नियम विद्यार्थ्यांच्या मुळावर! १ किमीच्या अटीमुळे हजारो गरीब मुले शिक्षणापासून वंचित राहण्याची भीती

Satana News : सटाणा शहराचा होणार कायापालट; २६ मीटर रुंदीचा काँक्रीट रस्ता आणि कायमस्वरूपी अतिक्रमण विरोधी पथक सज्ज

का मोडलेला रिमा लागू यांचा संसार? एकटेपणा आणि लोकप्रियतेच्या शिखरावर असतानाच घेतलेला घटस्फोट

Latest Marathi News Live Update : बोरिवलीतील MHB कॉलनी परिसर झाला नशेचा अड्डा, भाजप नगरसेवकाची धाड

T20 World Cup: संजू सॅमसनला संधी मिळणार? पण, त्यासाठी अभिषेकसह तीन खेळाडू रडारवर; कोणाची विकेट पडणार?

SCROLL FOR NEXT