मुंबई

अल्पवयीन मुलगा बेपत्ता

CD

अल्पवयीन मुलगा बेपत्ता
सकाळ वृत्तसेवा
ठाणे, ता. २३ : ठाणे रेल्वे स्थानकावरून कर्जत फास्ट लोकलने पुण्याकडे निघालेला १७ वर्षीय मुलगा या प्रवासात बेपत्ता झाल्याची घटना समोर आली आहे. याप्रकरणी ठाणे लोहमार्ग पोलिस ठाण्यात अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अपहरण झालेल्या मुलाच्या वडिलांनी तक्रार दिली आहे.
तरुणाचे वडिल मावळ येथील निवासी असून त्यांचा मुलगा हा मागील महिनाभरापासून ठाण्यातील कापुरबावडी येथे नातेवाईकांकडे राहत होता. शुक्रवारी (ता. २०) त्याला ठाणे रेल्वे स्थानकातून कर्जत फास्ट लोकलच्या जनरल डब्यात बसवून पुण्याकडे रवाना करण्यात आले. मात्र, त्यानंतर तो घरी पोहोचला नसल्याने कुटुंबियांनी नातेवाईक व मित्रांकडे शोध घेतला, तरीही त्याचा काहीच ठावठिकाणा लागला नाही. त्यामुळे अनोळखी व्यक्तीने फूस लावून त्याचे अपहरण केल्याचा संशय व्यक्त करण्यात आला आहे. याप्रकरणी ठाणे लोहमार्ग पोलिस ठाण्यात अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास वरिष्ठ पोलिस निरीक्षक अर्चना दुसाने यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Rohit Pawar: ''..तोपर्यंत मी शर्टचं वरचं बटण लावणार नाही'', विधानसभेत रोहित पवारांना अश्रू अनावर

भाजपच नाही, सोनिया गांधींनीही शब्द दिला होता! २०२७ पूर्वी विदर्भ वेगळा होणार, विदर्भ राज्य आंदोलन समितीने व्यक्त केला विश्वास

आम्ही आमचं बाळ गमावलं... लोकप्रिय मराठी इन्फ्लूएन्सर कपलला धक्का; म्हणाले- ५ व्या महिन्यात समजलं की...

Meat And Fish Ban: मांस आणि माशांच्या खुल्या विक्रीवर बंदी! आता परवानगी असेल तरच दुकान चालणार; राज्य सरकारची मोठी घोषणा

Mumbai: मुंबईतील हवा ‘भीषण’ स्तरावर; बांधकामांना आठवडाभर स्थगितीची मागणी; पालिका आयुक्तांना दिलेल्या पत्रात काय लिहिलंय?

SCROLL FOR NEXT