मुंबई

भिवंडीत मंदिरासमोर गटाराचे सांडपाणी

CD

भिवंडीत रस्त्यावरच गटाराचे सांडपाणी
भाविक, पादचाऱ्यांचे हाल; भाविकांमध्ये संतापाची लाट

भिवंडी, ता. २३ (बातमीदार) : शहरातील मुख्य बाजारपेठ असलेल्या नवी चाळ परिसरातील सुप्रसिद्ध महालक्ष्मी मंदिर प्रवेशद्वाराबाहेर महापालिकेची गटारे तुंबल्याने सांडपाणी थेट रस्त्यावर आले आहे. यामुळे परिसरात प्रचंड दुर्गंधी पसरली असून, पादचारी आणि भाविकांना या घाणीतूनच वाट काढावी लागत आहे. विशेष म्हणजे, या मंदिरालगतच दोन जैन मंदिरे असून, वारंवार तक्रारी करूनही पालिका प्रशासन याकडे डोळेझाक करत असल्याचा आरोप स्थानिक नागरिकांनी केला आहे.

सध्या सण-उत्सवांचे दिवस असून, मुस्लिम बांधवांचा पवित्र रमजान महिनाही सुरू झाला आहे. त्यामुळे खरेदीसाठी मुख्य बाजारपेठेत नागरिकांची मोठी गर्दी होत आहे. नवी चाळ परिसरातून दररोज शेकडो महिला आणि भाविक ये-जा करतात; मात्र तुंबलेल्या गटारांमुळे रस्त्यावर साचलेल्या सांडपाण्याने आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. येथील रस्ता वारंवार दुरुस्त करूनही गटारांची स्वच्छता होत नसल्याने रस्त्याची पुन्हा दुरवस्था झाली आहे.

स्थानिक नागरिकांनी या समस्येबाबत महापालिका प्रशासन आणि आरोग्य विभागाकडे अनेकदा लेखी तक्रारी केल्या आहेत. मात्र, अधिकारीवर्ग याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत असल्याचा संताप व्यक्त होत आहे. महापालिका आयुक्त अनमोल सागर यांनी या प्रकरणाची दखल घेऊन संबंधित स्वच्छता अधिकारी आणि आरोग्य निरीक्षकांवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी जोर धरू लागली आहे. स्थानिक शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनीही या भागात तातडीने विशेष स्वच्छता मोहीम राबवण्याची मागणी केली आहे.

कर्मचाऱ्यांचा कामचुकारपणा!
शहरात रमजान महिना सुरू असल्याने सर्वत्र स्वच्छता ठेवावी, असे आवाहन पालिका आयुक्त अनमोल सागर यांनी केले आहे. मात्र, आयुक्तांच्या या आवाहनाला खुद्द पालिकेचे अधिकारी, कर्मचारी आणि ठेकेदारच हरताळ फासत असल्याचे चित्र दिसत आहे. कर्मचाऱ्यांच्या या कामचुकारपणामुळे नागरिक त्रस्त असून, नवनिर्वाचित महापौर नारायण चौधरी यांनी यात वैयक्तिक लक्ष घालून प्रश्न मार्गी लावावा, अशी मागणी केली जात आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maoist Song Dance Pune: पुण्यातील वसतिगृहात माओवादी आशय असलेल्या गाण्यावर नृत्य; Video Viral

SBI Whatsapp : स्टेट बँकेत अकाऊंट आहे? तुमच्यासाठी मोठी खुशखबर; घरबसल्या व्हॉट्सॲपवर होणार सगळं काम, पाहा काय आहे नवी सुविधा

Latest Marathi News Update: नऱ्हे येथे पीएमपी बस अपघात; चालकाला फिट आल्याने बस कठड्यावर धडकली

स्वतः वाघ्या म्हणून काम केलं, महिलांचं शोषण जवळून पाहिलं; दिग्दर्शक अभिषेक जावीरने सांगितला 'फुला'चा थरार!

Beed News: परफेक्ट च्या शोधात अनेक जण रिजेक्ट; तरुणींच्या अटींमुळे तरुणांचे वय चालले वाढत; शेतकरी मुलांना नकारच

SCROLL FOR NEXT