मुंबई

उन्हाळ्यातील पाहुण्याची नवी मुंबईकरांना भुरळ

CD

बेलापूर, ता. २३ (बातमीदार) : स्थलांतरित पक्ष्यांसाठी मुबलक खाद्य, पाणी, पोषक वातावरण उपलब्ध असणाऱ्या नवी मुंबई शहरात नोव्हेंबरपासून विविध पक्ष्यांचे आगमन होते. अशातच हिवाळ्याच्या सरतेवेळी चिमणीच्या आकाराएवढा असणारा आणि आपल्या सौंदर्याने पक्षीप्रेमींना भुरळ पाडणाऱ्या धोबी पक्ष्यांचा मुक्त संचार सध्या शहरात दिसून येत आहे. सुमारे साडेचार हजार किमीचा प्रवास करत उन्हाळ्यातील हे पाहुणे पक्षी शहरातील टीएस चाणक्य येथे मोठ्या संख्येने नजरेस पडत आहेत.

विस्तृत, मध्य आणि पूर्व इंग्लंड, वेल्स आणि दक्षिण स्कॉटलंडच्या सखल प्रदेशात आढळणारे यलो वॅगटेल म्हणजेच पिवळा धोबी पक्ष्यांना ओलसर दलदली, शेतजमीन आवडते. उन्हाळ्यातील पाहुणे म्हणून, ते साधारण मार्चपासून त्यांच्या आफ्रिकन हिवाळ्यातील ठिकाणांमधून येतात. मात्र, यंदा फेब्रुवारीतच नवी मुंबईसह आजुबाजूच्या शहरात उष्णता वाढल्याने यंदाच्या वर्षी लवकरच पिवळ्या धोबी पक्ष्याचे आगमन झाले आहे. पिवळ्या वॅगटेलचा वरचा भाग ऑलिव्ह-हिरवा आणि खाली पिवळा असतो, त्याचा चेहरा पिवळा आणि काळी-पांढरी शेपटी असते. नर मादींपेक्षा उजळ असतात. समान राखाडी वॅगटेललादेखील पिवळे पोट असते, परंतु त्यांची पाठ राखाडी आणि काळे पंख असतात. सध्या शहरातील टीएस चाणक्य येथील ओलसर जमिनीवर, गवतात, तलावाशेजारी अथवा पाणथळ जागेवर झाडांवर हे पक्षी मोठ्या संख्येने दिसत असून, पक्षीप्रेमी, अभ्यासक या पक्ष्यांचा हालचाली टिपण्यासाठी चाणक्य येथे गर्दी करत आहेत.

कीटकांचा पाठलाग करण्यात पटाईत
या पक्षाचे विशेष आकर्षण म्हणजे ते जमिनीवर धावण्यात आणि कीटकांचा पाठलाग करण्यात बराच वेळ घालवतात. कीटक पकडण्यात हे पक्षी पटाईत आहेत. जमिनीवर किंवा लांब गवतावर हे पक्षी आपले घरटे बांधतात. यासाठी वनस्पती, गवत आणि देठांचा वापर करून कप-आकार तयार करतात.

भारतात या पक्ष्याच्या तीन ते चार जाती आढळतात. वारंवार शेपटीची खाली-वर हालचाल करण्याच्या सवयीमुळे त्याला धोबी हे नाव मिळाले आहे. धोबी पक्ष्याचा विणीचा हंगाम मार्च ते सप्टेंबर असतो. सध्या नवी मुंबईसह ठाणे क्रीक, उरण या ठिकाणी हे पक्षी आढळून येत आहेत.
- प्रथमेश देसाई, पक्षी अभ्यासक

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bhaskar Jadhav: 'कुठेतरी घातपात झालाय, असंच वाटतंय'! अजितदादांच्या विमान अपघातावर भास्कर जाधव महत्वाचे बोलले

Stock Market Today: शेअर बाजार तेजीत बंद! मात्र IDFC First Bank आणि TCS ला मोठा धक्का; कोणते शेअर्स तेजीत?

Crime: भयंकर! फक्त ३० सेकंद, २७ वेळा चाकूने वार अन्...; अल्पवयीन तरुणांचं दहावीच्या विद्यार्थ्यासोबत क्रूर कृत्य, कारण काय?

Malegaon News : मालेगावचा पाणी अहवाल समोर! वर्षभरात २ हजार नमुन्यांची तपासणी, ८२ ठिकाणी आढळले दूषित पाणी

Latest Marathi News Live Update : लातूरच्या पोहरेगाव परिसरात गारांचा पाऊस, शेती पिकांचे मोठं नुकसान

SCROLL FOR NEXT