मुंबई

शहीदी समागमनिमित्त उल्हासनगरमध्ये सामूहिक गीत गायन

CD

उल्हासनगर, ता. २३ (बातमीदार) : शीखांचे नववे गुरू गुरु तेग बहादूर (हिंद-दी-चादर) यांच्या ३५०व्या शहीदी समागमनिमित्त उल्हासनगर महापालिका क्षेत्रातील सर्व शाळांमध्ये सामूहिक गीत गायनाचा कार्यक्रम उत्साहात पार पडला. विशेषतः शाळा क्रमांक २४ आणि शाळा क्रमांक १८ येथे महापौर अश्विनी निकम यांच्या प्रमुख उपस्थितीत हा कार्यक्रम झाला.
महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त डॉ. किशोर गवस यांनी समागमाचे ऐतिहासिक व सामाजिक महत्त्व अधोरेखित केले. या सामूहिक गीत गायन उपक्रमाची नोंद बेस्ट ऑफ इंडिया रेकॉर्डस या संस्थेकडून घेणार असल्याची माहिती त्यांनी दिली. या वेळी महापौर निकम व महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी संबंधित शाळांची पाहणी केली. पाहणीदरम्यान विद्यार्थ्यांना डिजिटल स्क्रीनच्या माध्यमातून कृत्रिम बुद्धिमत्ता तंत्रज्ञानाद्वारे दिल्या जाणाऱ्या अध्यापनाचे प्रात्यक्षिक सादर करण्यात आले. या उपक्रमाबाबत समाधान व्यक्त करत विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर होत असल्याचे नमूद करण्यात आले.
कार्यक्रमाला उपआयुक्त अनंत जवादवार, शिक्षण विभागाचे प्रशासन अधिकारी दीपक धनगर, सहाय्यक आयुक्त तथा जनसंपर्क अधिकारी अजय साबळे, सहाय्यक आयुक्त गणेश शिंपी, मनीष हिवरे, सलोनी निवकर, विद्युत विभागप्रमुख हनुमंत खरात, कर निर्धारक व संकलक नीलम कदम, अभिलेखा विभाग प्रमुख अच्युत सासे, विधी विभागप्रमुख राजा बुलानी, मुख्य स्वच्छता निरीक्षक एकनाथ पवार, सामान्य प्रशासन विभाग प्रमुख अजित गवारी, पर्यावरण विभागप्रमुख दत्तात्रय जाधव आणि सिस्टम ॲनालिस्ट श्रद्धा बाविस्कर उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

खुर्चीला बांधलं अन् तोंडावर टेप लावली; लोकप्रिय अभिनेत्रीच्या वडिलांची हत्या; पर्यटक बनून आले आणि...

Palghar News: भिवंडी-वाडा-मनोर महामार्ग सात वर्षांपासून रखडला; आठ दिवसांत काम न झाल्यास...; प्रशासनाला थेट इशारा कुणी दिला?

Latest Marathi News Live Update : निफाड तालुक्यातील दुर्दैवी घटनेनंतर आरोपींच्या तात्काळ अटकेची मागणी

भूमी अभिलेख कार्यालयातील कर्मचारी काम बंद आंदोलन करणार! शासनाविरोधात तीव्र भूमिका; का आणि कधीपासून?

नागपूरकरांनो लक्ष द्या! राष्ट्रपतींच्या दौऱ्यादरम्यान शहरातील वाहतुकीत होणार बदल, 'हे' असतील पर्यायी मार्ग

SCROLL FOR NEXT