मुंबई

डम्परच्या चाकाखाली येऊन महिलेचा मृत्यू

CD

पनवेल, ता. २३ (वार्ताहर) : लग्नावरून परतणाऱ्या एका दाम्पत्याच्या दुचाकीला भरधाव डम्परने धडक दिल्याने झालेल्या अपघातात दुचाकीवरील ३९ वर्षीय महिलेचा जागीच मृत्यू झाला, तर तिचे पती गंभीर जखमी झाले आहेत. पळस्पे-जेएनपीए मार्गावरील कान्होबा ढाब्यासमोर रविवार (ता. २२) दुपारी घडला. पनवेल शहर पोलिसांनी डम्परचालकावर गुन्हा दाखल करून त्याला ताब्यात घेतले आहे.

उरण येथील न्हावा गाव येथील रहिवासी मिथुन कुंडलीक भोईर (वय ३९) हे रविवारी दुपारी आपली पत्नी स्वप्ना यांच्यासह कर्जतजवळील नडाळ येथे एका लग्नकार्यासाठी गेले होते. लग्न आटोपून ते मोटारसायकलने पळस्पे मार्ग न्हाव्याकडे परतत होते. या वेळी त्यांची मोटारसायकल गव्हाणफाटा येथील कान्होबा ढाबा येथे आली असताना, पाठीमागून येणाऱ्या डम्परने त्यांच्या मोटारसायकलला जोराची धडक दिली. डम्परच्या धडकेमुळे भोईर दाम्पत्य दुचाकीसह रस्त्यावर फेकले गेले. स्वप्ना या डम्परच्या उजव्या बाजूच्या मागील टायरखाली आल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला, तर मिथुन भोईर हे गंभीर जखमी झाल्याने कामोठे येथील एमजीएम रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. त्यांची प्रकृती चिंताजनक आहे. बेदरकार डम्परचालकाने भोईर दाम्पत्यासह आणखी एका मोटारसायकलला धडक दिली. यामध्ये दुचाकीस्वार जखमी झाला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

TCS Nashik case: टीसीएस नाशिकमध्ये खळबळ! धर्मांतरण-छळ आरोपांमुळे ऑफिस बंद, आंतरराष्ट्रीय संबंधांच्या संशयावरून तपास तीव्र

RCB vs LSG Live: विराट कोहलीच्या बाबतीत २ गोष्टी आज पहिल्यांदाच घडल्या... बंगळुरूची IPL 2026 Point Table मध्ये मोठी उलथापालथ

Pune DSK Vishw News: जीबीएसचा धोका कमी करण्यासाठी महापालिकेचा निर्णय; डीएसके विश्वला पावसाळ्यापूर्वी शुद्ध पाणीपुरवठा

Viral Video : हे, पाकिस्तानातच घडू शकतं... Run Out साठी खेळाडू चेंडू थ्रो करायचं सोडून घेऊन पळत सुटला... पोरीही हसल्या...

India AI : ओपनएआय अहवालात भारत आघाडीवर; एआयचा वापर चारपट वाढला, शहरांमध्ये टेक क्रांतीची लाटआघाडीवर...

SCROLL FOR NEXT