मुंबई

पित्यानेच मुलींना ढकलले वेश्याव्यवसायात

CD

नवी मुंबई, ता. २३ (वार्ताहर) : कोपरखैरणे येथील एका व्यक्तीने आपल्या १६ आणि १४ वर्षांच्या दोन मुलींना वेश्याव्यवसायात ढकलल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. नवी मुंबई पोलिसांच्या अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्षाने बेलापूर येथे केलेल्या कारवाईदरम्यान दोन मुलींची सुटका केल्यानंतर पित्याचा काळजाचा थरकाप उडवणारा चेहरा समोर आला आहे. पोलिसांनी पित्यासह एका दलालावर गुन्हा दाखल करून मुली पुरविणाऱ्या दलालाला अटक केली आहे.

हरिष विकास छारी (वय २७) नावाचा दलाल मुलींना वेश्याव्यवसायासाठी पुरवत असल्याची माहिती अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंध कक्षाला मिळाली होती. या मुली वयाने लहान असल्याने त्यांना हॉटेलमध्ये प्रवेश मिळत नसल्याने दलाल त्यांना ग्राहकाच्या सोयीनुसार हव्या त्या ठिकाणी पोहोचवत असल्याचे, तसेच एका मुलीचा सौदा तब्बल दीड लाखांना ठरवला जात असल्याची माहिती मिळाली होती. त्यानुसार कक्षाचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक पृथ्वीराज घोरपडे यांनी बनावट ग्राहकाच्या माध्यमातून दलाल हरिष याच्याशी संपर्क साधत मुलींना घेऊन येण्यास सांगितले. त्यानुसार हरिष सीबीडी बेलापूर सेक्टर ११ येथील के स्टार हॉटेल समोरील चौकात दोन मुलींना घेऊन आल्यानंतर कक्षाने त्या ठिकाणी छापा टाकला. तसेच दोन मुलींसह त्याला ताब्यात घेतले.

पित्याचे क्रूर कृत्य उघड
या प्रकरणात दुसरा संशयित आरोपी राज सिंग उर्फ राजा हा पीडित मुलींचा पिता असल्याचे समोर आले. पैशांच्या हव्यासापोटी त्याने आपल्या दोन्ही मुलींना दलालाच्या स्वाधीन केले होते. मुलींचे फोटो ग्राहकांना दाखवून दीड लाखाला व्यवहार करण्यात येत असल्याचे समोर आले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Free Government Scheme: मोफत लाभ घ्या सरकारकडून! या 7 सरकारी योजनांचा फायदा तुम्ही घेताय का? अनेकांना तर याची माहितीच नाही...

Nashik Bike Theft : नाशिकमध्ये दुचाकी चोरट्यांचा धुमाकूळ; एकाच वेळी सहा वाहने लंपास, वाहनधारकांमध्ये संतापाची लाट

Nashik Industrial Fire : सातपूर हादरले! वासाळीत दोन प्लॅस्टिक गुदामांना भीषण आग; एक कोटींचे साहित्य खाक

Latest Marathi News Live Update : धारावीतील परवाना नसलेल्या ठिकाणी औषध साठा जप्त

Solapur News: माळशिरसच्या तलाव, बंधाऱ्यांत ४० टक्के पाणीसाठा; गतवर्षी चार गावांमध्ये टॅंकरने पाणीपुरवठा, संभाव्य टंचाई आराखडा तयार!

SCROLL FOR NEXT