मुंबई

चौकीचापाडा येथील राजिप शाळेच्या नवीन इमारतीचे उद्घाटन

CD

चौकीचापाडा येथील राजिप शाळेच्या नवीन इमारतीचे उद्‍घाटन
प्रशस्त वर्गखोल्या, ‘डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम’ दालन व सुसज्ज सभागृहाची सुविधा; ग्रामस्थांच्या पाठपुराव्याला यश
पोयनाड, ता. २३ (बातमीदार) : अलिबाग तालुक्यातील चौकीचापाडा गावातील रायगड जिल्हा परिषदेच्या मराठी शाळेच्या नव्या इमारतीचे उद्‍घाटन उत्साहात पार पडले. राजिपचे माजी अध्यक्ष आस्वाद पाटील, माजी सदस्या चित्रा पाटील तसेच अलिबाग पंचायत समितीचे माजी सभापती जनार्दन पाटील यांच्या हस्ते हा सोहळा संपन्न झाला. जुनी इमारत जीर्ण होऊन तडे गेले होते व स्लॅबचा काही भाग कोसळल्याने विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झाला होता. चौकीचापाडा, वालवडे व पांडवादेवी येथील विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये यासाठी ग्रामस्थांनी शिक्षण विभाग व पंचायत समितीकडे सातत्याने पाठपुरावा केला होता.
ग्रामस्थांच्या मागणीनुसार जनार्दन पाटील यांच्या पुढाकाराने तसेच शहाबाज ग्रामपंचायतीचे उपसरपंच भूपेंद्र पाटील व जगदीश पाटील यांच्या सहकार्याने नव्या इमारतीचे बांधकाम पूर्ण करण्यात आले. नव्या शाळेत प्रशस्त वर्गखोल्या, मुख्याध्यापक कक्ष, ‘भारतरत्न डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम’ दालन व ‘जनार्दन अनंत पाटील’ सभागृह तयार करण्यात आले आहे. विद्यार्थ्यांना शैक्षणिक माहिती मिळावी यासाठी भिंतींवर आकर्षक शैक्षणिक चित्रेही साकारण्यात आली आहेत.
उद्घाटनानिमित्त विद्यार्थ्यांनी विविध वेशभूषेत टाळ-मृदुंगाच्या गजरात वारकरी बांधवांसह गावातून दिंडी काढून वातावरण भारावून टाकले. कार्यक्रमाला मुख्याध्यापिका, शिक्षकवृंद, वारकरी संप्रदायातील मंडळी, ग्रामस्थ, पालक व महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते.

छायाचित्र :
पोयनाड : चौकीचापाडा येथील राजिप शाळेच्या नवीन इमारतीचे उदघाटन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CSK ने RCB विरोधात ठोठावलं BCCI चं दार, दाखल केली तक्रार; पण असं काय घडलंय?

‘मी सावित्रीबाई जोतीराव फुले’ मालिकेत मोठा ट्वीस्ट, अमोल कोल्हे आणि मधुराणीची एन्ट्री, नेटकरी म्हणाले...'दोघेही हुबेहूब...'

Latest Marathi News Live Update : हिंगोलीत उष्माघाताचा पहिला बळी; ४०°C तापमानामुळे नागरिकांना सतर्कतेचा इशारा

Gold Rate Today: एप्रिल महिन्यात सोन्याच्या भावात मोठा बदल! अक्षय तृतीयेआधी बाजारात उलटफेर; जाणून घ्या आजचा भाव

विधान परिषदेच्या १७ जागांवर लवकरच निवडणूक, तर ९ सदस्यांचा कार्यकाळ संपणार; कुणाला किती जागा मिळणार?

SCROLL FOR NEXT