मुंबई

पनवेलमधील १९ ग्रामपंचायतींवर सरपंचच प्रशासक

CD

पनवेल, ता. २३ (बातमीदार) : तालुक्यात एकूण ७१ ग्रामपंचायती आहेत. त्यापैकी ४३ ग्रामपंचायतींची सरपंचपदाची मुदत संपलेली आहे. सध्या १९ ग्रामपंचायतींची मुदत संपत असून त्या ठिकाणी नवीन नियमानुसार विद्यमान सरपंचांची प्रशासक म्हणून नियुक्ती करण्यात येणार असल्याची माहिती गटविकास अधिकारी समीर वाठारकर यांनी दिली. सरकारच्या या निर्णयामुळे ग्रामपंचायतींच्या दैनंदिन कारभारात सातत्य राहणार असल्याचे सांगितले जात आहे.

मुदत संपत असलेल्या या सर्व १९ ग्रामपंचायतींवर संबंधित विद्यमान सरपंच प्रशासक म्हणून कामकाज पाहणार आहेत. सरकारने काढलेल्या परिपत्रकानुसार निवडणुका होईपर्यंत प्रशासकीय कामकाज सुरळीत चालावे, विकासकामांना खंड पडू नये, तसेच शासकीय योजनांची अंमलबजावणी नियमितपणे व्हावी, यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. यामुळे पाणीपुरवठा, स्वच्छता, रस्ते दुरुस्ती, तसेच विविध विकास योजनांचे प्रस्ताव व मंजुरी प्रक्रिया यामध्ये सातत्य राहणार आहे.

विकासकामांना गती
ग्रामपंचायतींच्या आगामी निवडणुकांबाबत ग्रामस्थांमध्ये उत्सुकता आहे. निवडणूक कार्यक्रम जाहीर होईपर्यंत प्रशासक म्हणून सरपंचांनाच जबाबदारी देण्याचा निर्णय महत्त्वाचा मानला जात आहे. स्थानिक पातळीवरील विकासकामांना गती देण्यासाठी हा निर्णय सकारात्मक ठरेल, अशी प्रतिक्रिया काही ग्रामस्थांनी व्यक्त केली आहे.


ग्रामपंचायतीचे नावे
आदाई, चिपळे, जांभिवली, कर्नाळा, कुंडेवहाळ, नांदगांव, पळस्पे, पारगांव, पोयंजे, शिरवली, तरघर, उलवे, वावंजे, वहाळ, वांगणी तर्फे वाजे, गव्हाण, वडघर, चावणे, कराडे खुर्द

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai: रस्ते आणि पुलांना नवी ओळख मिळणार! मुंबईतील महत्त्वाच्या ठिकाणांची नावे बदलणार; पण कोणत्या? जाणून घ्या यादी...

Rohit Pawar: ''..तोपर्यंत मी शर्टचं वरचं बटण लावणार नाही'', विधानसभेत रोहित पवारांना अश्रू अनावर

भाजपच नाही, सोनिया गांधींनीही शब्द दिला होता! २०२७ पूर्वी विदर्भ वेगळा होणार, विदर्भ राज्य आंदोलन समितीने व्यक्त केला विश्वास

आम्ही आमचं बाळ गमावलं... लोकप्रिय मराठी इन्फ्लूएन्सर कपलला धक्का; म्हणाले- ५ व्या महिन्यात समजलं की...

Meat And Fish Ban: मांस आणि माशांच्या खुल्या विक्रीवर बंदी! आता परवानगी असेल तरच दुकान चालणार; राज्य सरकारची मोठी घोषणा

SCROLL FOR NEXT