मुंबई

शिवसेना ठाकरे पक्षाकडून निवेदन

CD

मुक्ताबाई रुग्णालयातील समस्यांबाबत शिवसेना ठाकरे पक्षाकडून निवेदन

घाटकोपर, ता. २३ (बातमीदार) : घाटकोपर पश्चिम भटवाडी येथील मुक्ताबाई रुग्णालय येथे शिवसेना (ठाकरे पक्ष) विभागप्रमुख सुरेश पाटील आणि प्रभाग १२७च्या नगरसेविका स्वरूपा पाटील यांनी भेट देत विविध प्रलंबित समस्यांबाबत रुग्णालय प्रशासनाशी चर्चा केली. या वेळी त्यांनी रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉ. पवार यांच्याशी सविस्तर संवाद साधत नागरिकांच्या मागण्यांचे निवेदन सादर केले. शाखाप्रमुख संजय कदम यांच्यासह इतर पदाधिकारीदेखील उपस्थित होते.
रुग्णालयात वाढत्या गर्दीच्या पार्श्वभूमीवर सुरक्षा रक्षकांची संख्या वाढवावी तसेच २४ तास पोलिस बंदोबस्त ठेवावा, अशी प्रमुख मागणी करण्यात आली. आपत्कालीन विभागासाठी सुरू करण्यात आलेला २४ तास शस्त्रक्रिया विभाग गरोदर महिलांसाठीही पूर्ववत सुरू करावी, जेणेकरून गरजू महिलांना तत्काळ उपचार मिळू शकतील, अशीही मागणी या वेळी करण्यात आली. तसेच ऑनलाइन केसपेपर प्रणाली आणि एचएमआयएस प्रणालीमुळे गरीब व गरजू रुग्णांना होणाऱ्या अडचणींचा आढावा घेऊन त्यावर पर्यायी उपाययोजना कराव्यात, अशी मागणी पदाधिकाऱ्यांनी प्रशासनाकडे केली. नागरिकांना अधिक सुलभ, सुरक्षित आणि परिणामकारक आरोग्यसेवा मिळावी, हा या भेटीचा प्रमुख उद्देश असल्याचे नगरसेविका स्वरूपा पाटील यांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Rohit Pawar: अजित पवारांनी रोहित पवारांचं लग्न कसं जमवलं? विधानसभेच्या शोकप्रस्तावात सांगितली आठवण

पाकड्यांची रडारड सुरू! आम्हाला 'समान वागणूक' हवीय; क्रिकेट बोर्ड लिहिणार पत्र, IPL फ्रँचायाझींवर पक्षपातीपणाचा आरोप

Contaminated milk tragedy: भेसळयुक्त दुधामुळे ४८ तासांत किडनी निकामी होऊन चौघांचा मृत्यू ; १२ जण रूग्णालयात दाखल

Yerwada Fire : येरवड्यात भीषण आगीमध्ये १५ मोटारींसह ५० दुचाकी जळून खाक

Latest Marathi News Live Update : कुठल्याही अटीशर्ती न टाकता सरसकट कर्जमाफी द्यावी, पुणतांबातील शेतकऱ्यांची मागणी

SCROLL FOR NEXT