मुंबई

कौशल्य विकास केंद्रात चामड्याच्या पादत्राणांचे प्रशिक्षण सुरू

CD

कौशल्य विकास केंद्रात चामड्याच्या पादत्राणांचे प्रशिक्षण सुरू
प्रशिक्षण कार्यक्रमाद्वारे आत्मनिर्भरतेचा पुरस्कार - पीयूष गोयल

मुंबई, ता. २३ : उत्तर मुंबईचे खासदार, केंद्रीय वाणिज्य व उद्योगमंत्री पीयूष गोयल यांच्या पुढाकारातून कांदिवली (पूर्व) येथील अटल बिहारी वाजपेयी कौशल्य विकास केंद्र येथे चर्मकार समाजातील सदस्यांसाठी चामड्याच्या पादत्राणांचे उत्पादन कौशल्य विकास प्रशिक्षण सुरू करण्यात आले आहे. समावेशक विकासाच्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून प्रेरित हा उपक्रम समुदायातील सदस्यांना आधुनिक बाजारपेठेच्या गरजांनुसार उत्पादने तयार करण्याची कौशल्ये आत्मसात करण्यास मदत करणार आहे.
सध्या चर्मकार समाजातील २० सदस्यांना २७ जानेवारी ते २४ फेब्रुवारी २०२६ या कालावधीत प्रत्यक्ष प्रशिक्षण देण्यात आले. या प्रशिक्षणासाठी आग्रा येथील सेंट्रल फूटवेअर ट्रेनिंग इन्स्टिट्यूट येथून देवेंद्र तिवारी आणि मिथुन कुमार सिंग या तज्ज्ञ प्रशिक्षकांची नियुक्ती करण्यात आली होती. प्रशिक्षणामध्ये डर्बी बूट, पुरुषांसाठी टाके घालून तयार करण्यात येणाऱ्या चपला तसेच महिलांसाठीच्या चपला अशा तीन प्रकारच्या पादत्राणांच्या निर्मितीचा समावेश होता. देशांतर्गत तसेच जागतिक बाजारपेठेत दर्जेदार पादत्राणांच्या वाढत्या मागणीची दखल घेत हे प्रशिक्षण संत रोहिदास महाराज यांच्या ६५०व्या जयंतीनिमित्त ग्रामोद्योग विकास योजनेअंतर्गत आयोजित करण्यात आले आहे. या उपक्रमाबाबत बोलताना पीयूष गोयल म्हणाले, की पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दूरदृष्टीपूर्ण नेतृत्वाखाली आमचे सरकार आत्मनिर्भर भारत उभारण्यास कटिबद्ध आहे. आधुनिक प्रशिक्षण, आर्थिक सहाय्य आणि बाजारपेठेपर्यंत पोहोच यांद्वारे चर्मकार समाजाला सक्षम करणे म्हणजे पारंपरिक कौशल्यांना शाश्वत उद्योजकतेमध्ये रूपांतरित करण्याकडे टाकलेले महत्त्वपूर्ण पाऊल आहे. चामडा क्षेत्रासाठीच्या धोरणात्मक पाठबळावर प्रकाश टाकताना त्यांनी पादत्राणांवरील वस्तू व सेवा कर १२ टक्क्यांवरून पाच टक्क्यांपर्यंत कमी करण्यात आल्याचे नमूद केले. त्यामुळे उत्पादन खर्च कमी झाला असून, स्पर्धात्मकता वाढली आहे. याचा लाभ लघु उत्पादक व कारागिरांना होत आहे. उत्तर मुंबईतील चर्मकार समाजातील सदस्यांना प्राधान्य देण्यात आले असले तरी हा प्रशिक्षण कार्यक्रम इतर इच्छुकांसाठीही खुला आहे.
.......................................

चौकट
चर्मकार बांधवांची कारखान्याला भेट

उत्तर मुंबईतील चर्मकार समाजातील २० प्रशिक्षणार्थी सदस्यांनी दोन प्रशिक्षकांसह शनिवारी (ता. २१) मिरा-भाईंदर येथील काशी मिरा परिसरात असलेल्या शूज/बूट्स, सँडल्स आणि स्लीपर्स निर्मिती करणाऱ्या एका कारखान्याला भेट दिली. या भेटीदरम्यान कोणत्या प्रकारच्या लेदरचा वापर करावा आणि लेदरवर विविध प्रकारचे डिझाइन्स कशी तयार करता येतात, याबाबत सविस्तर प्रात्यक्षिक देण्यात आले. सोल फिटिंगची प्रक्रिया कशी केली जाते, याचेही प्रत्यक्ष मार्गदर्शन करण्यात आले. कच्च्या मालापासून अंतिम उत्पादनापर्यंत स्लीपर निर्मितीची संपूर्ण प्रक्रिया समजावून सांगण्यात आली. तसेच तयार झालेल्या स्लीपर्सचे पॅकिंग कसे केले जाते आणि त्यातील दोषयुक्त (डिफॉल्ट) स्लीपर्स कशा प्रकारे ओळखून वेगळ्या केल्या जातात, याचेही प्रात्यक्षिक दाखवण्यात आले. याशिवाय कुशल हस्तकला कारागिरांशी बैठक आयोजित करण्यात आली, ज्यातून पारंपरिक कारागिरीचे प्रत्यक्ष ज्ञान मिळाले. हे प्रशिक्षण प्रशिक्षणार्थ्यांसाठी जीवन बदलणारे आणि परिवर्तनकारी ठरेल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

TCS Nashik case: टीसीएस नाशिकमध्ये खळबळ! धर्मांतरण-छळ आरोपांमुळे ऑफिस बंद, आंतरराष्ट्रीय संबंधांच्या संशयावरून तपास तीव्र

RCB vs LSG Live: विराट कोहलीच्या बाबतीत २ गोष्टी आज पहिल्यांदाच घडल्या... बंगळुरूची IPL 2026 Point Table मध्ये मोठी उलथापालथ

Pune DSK Vishw News: जीबीएसचा धोका कमी करण्यासाठी महापालिकेचा निर्णय; डीएसके विश्वला पावसाळ्यापूर्वी शुद्ध पाणीपुरवठा

Viral Video : हे, पाकिस्तानातच घडू शकतं... Run Out साठी खेळाडू चेंडू थ्रो करायचं सोडून घेऊन पळत सुटला... पोरीही हसल्या...

India AI : ओपनएआय अहवालात भारत आघाडीवर; एआयचा वापर चारपट वाढला, शहरांमध्ये टेक क्रांतीची लाटआघाडीवर...

SCROLL FOR NEXT