मुंबई

रिंग रोडवर कार रेसिंगचा कहर निष्पाप नागरिक गंभीर जखमी

CD

रिंग रोडवर कार रेसिंगचा कहर
अज्ञात कारची दुचाकीला जोरदार धडक; नागरिक गंभीर जखमी
सकाळ वृत्तसेवा
डोंबिवली, ता. २३ ः डोंबिवली, कल्याण आणि टिटवाळा या शहरांना जोडण्यासाठी उभारलेल्या महत्त्वाकांक्षी रिंग रोड प्रकल्पावर बेफाम कार रेसिंग आणि स्टंटबाजीचा कहर दिवसेंदिवस वाढत आहे. यामुळे गंभीर अपघातांची मालिका सुरूच आहे. अशाच एका अपघातात विकास कुंभार (४९) हे गंभीर जखमी झाले असून, त्यांची प्रकृती चिंताजनक आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, विकास कुंभार हे कल्याण पश्चिम येथील आदित्य ऑटोमोबाईल गॅरेजचे मालक आहेत. १८ फेब्रुवारीला रात्री ते काम आटोपून ॲक्टिव्हा दुचाकीवरून घरी परतत होते. नवीन गांधारी-वडवली रिंग रोडवरून जात असताना पाठीमागून आलेल्या एका अज्ञात भरधाव कारने त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली. ही धडक इतकी भीषण होती, की त्यांच्या डोक्याला आणि उजव्या हाताला गंभीर दुखापत झाली. अपघातानंतर कारचालकाने जखमीला मदत न करता घटनास्थळावरून पळ काढल्याने संताप व्यक्त होत आहे. उपस्थित नागरिकांनी कुंभार यांना तातडीने वेदान्त हॉस्पिटल येथे दाखल केले. मात्र प्रकृती गंभीर असल्याने पुढील उपचारासाठी त्यांना आयुर हॉस्पिटल येथील आयसीयूमध्ये हलवण्यात आले आहे. याप्रकरणी त्यांच्या मुलाने खडकपाडा पोलिस ठाणे येथे अज्ञात वाहनचालकाविरोधात तक्रार दाखल केली आहे.

जीवघेणी स्टंटबाजी नागरिकांच्या जीवावर
१. रिंग रोड प्रकल्प अद्याप सर्वसामान्यांसाठी अधिकृतपणे सुरू झालेला नसतानाही गुळगुळीत आणि मोकळा रस्ता असल्याने रात्रीच्या वेळी तरुणांकडून कार रेसिंग आणि दुचाकींवर जीवघेणी स्टंटबाजी सुरू असल्याचे स्थानिकांचे म्हणणे आहे. या ठिकाणी गतिरोधक नसल्यामुळे वाहनांचा वेग प्रचंड वाढतो आणि त्यामुळे वारंवार अपघात घडत असल्याचेही नागरिकांचे म्हणणे आहे.
२. रस्त्यावर फिरण्यासाठी येणारे नागरिक, पादचारी आणि स्थानिक रहिवाशांचा जीव या बेफाम वाहनचालकांमुळे धोक्यात आला आहे. पोलिसांनी यापूर्वी काही कारवाया केल्या असल्या तरी स्टंटबाजांवर कायमस्वरूपी वचक बसलेला नाही, अशी तक्रार स्थानिकांनी केली आहे.
३. या पार्श्वभूमीवर परिसरात नियमित पोलिस गस्त, गतिरोधकांची उभारणी आणि भरधाव वाहनांवर कडक कारवाई करण्याची मागणी स्थानिक नागरिक आणि जखमीच्या कुटुंबीयांनी प्रशासनाकडे केली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bhaskar Jadhav: 'कुठेतरी घातपात झालाय, असंच वाटतंय'! अजितदादांच्या विमान अपघातावर भास्कर जाधव महत्वाचे बोलले

Stock Market Today: शेअर बाजार तेजीत बंद! मात्र IDFC First Bank आणि TCS ला मोठा धक्का; कोणते शेअर्स तेजीत?

Crime: भयंकर! फक्त ३० सेकंद, २७ वेळा चाकूने वार अन्...; अल्पवयीन तरुणांचं दहावीच्या विद्यार्थ्यासोबत क्रूर कृत्य, कारण काय?

Malegaon News : मालेगावचा पाणी अहवाल समोर! वर्षभरात २ हजार नमुन्यांची तपासणी, ८२ ठिकाणी आढळले दूषित पाणी

Latest Marathi News Live Update : लातूरच्या पोहरेगाव परिसरात गारांचा पाऊस, शेती पिकांचे मोठं नुकसान

SCROLL FOR NEXT