मुंबई

डोंबिवलीत मराठी-गुजराती संत साहित्य आदान-प्रदान सोहळा भक्तिमय वातावरणात संपन्न

CD

डोंबिवलीत मराठी-गुजराती संस्कृतीचा भक्ती संगम
ग्राम महोत्सवात संतांच्या साहित्याचा जागर
सकाळ वृत्तसेवा
डोंबिवली, ता. २३ ः डोंबिवलीतील टिळकनगर पेंढारकर सभागृह येथे ग्राम महोत्सवानिमित्त आयोजित मराठी-गुजराती संत साहित्य आदान-प्रदान सोहळा उत्साहात आणि भक्तिमय वातावरणात पार पडला. खेडेगावाच्या सुंदर प्रतिकृतींनी सजविलेल्या सभागृहामुळे ग्रामीण संस्कृतीचा जिवंत अनुभव उपस्थितांना मिळाला. पारंपरिक सजावटीमुळे संपूर्ण परिसर भक्तिरसाने आणि सांस्कृतिक रंगांनी नटला होता.
कार्यक्रमाची सुरुवात कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेचे नवनिर्वाचित नगरसेवक महेश पाटील, मंदा पाटील, सायली विचारे आणि अभिजित थरवळ यांच्या हस्ते दीपप्रज्वलनाने झाली. कार्यक्रमात मराठी संत परंपरेतील संत तुकाराम, संत ज्ञानेश्वर, समर्थ रामदास स्वामी आणि बहिणाबाई चौधरी यांच्या अभंग-ओव्यांचे सादरीकरण करण्यात आले. गुजराती सादरीकरणात संत नरसिंह मेहता यांच्या भक्तिरचना सादर करण्यात आल्या. आणि मीराबाई यांच्या भजनांनी कार्यक्रमात भक्तिरसाची रंगत आणखी वाढवली.
ढोलकी-तबल्यावर मकरंद विष्णू आणि हार्मोनियमवर अरूण साळुंखे यांनी सुरेल साथ दिली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अश्विन देरासरी आणि दुर्गाराज जोशी यांनी केले. संयोजनाची जबाबदारी निरंजन पंड्या यांनी सांभाळली, तर निखिल वैद्य यांचेही महत्त्वपूर्ण योगदान लाभले.
भक्ती, संस्कृती आणि लोकपरंपरेचा सुंदर संगम घडवणारा हा संत साहित्य आदान-प्रदान सोहळा उपस्थितांच्या उत्स्फूर्त प्रतिसादात पार पडला.

लावणी व गुजराती नृत्याने रसिक मंत्रमुग्ध
सुनीता काटकर यांनी जोगवा आणि जागरण सादर करून वातावरण भारावून टाकले. पारंपरिक लावणी सादरीकरणाने रसिक मंत्रमुग्ध झाले. विकास नायक यांनी लोककला सादर केली, तर अरुण साळुंखे यांनी ‘तुका आकाशा एवढा…’ हा अभंग सादर केला. डॉ. पराग झवेरी आणि विकास नायक यांनी गुजराती नृत्य सादर केले. अल्फाबेन गदेरा यांनी मीराबाईंचे भजन सादर केले. याशिवाय सुनीता जबडे, रश्मी जबडे आणि बाबी पवार यांनी वासुदेव गीत, मनाचे श्लोक आणि बहिणाबाईंच्या कविता सादर करून उपस्थितांना मंत्रमुग्ध केले. प्रतिभा वैध यांनी लावणी नृत्य सादर केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

kolhapur Danoli killing case : दानोळी २५ लाखांच्या अपहरण करून खून प्रकरणाला नवे वळण; एकावर डोळा, दुसऱ्यावर गेम, गुप्तांगाला दिला विजेचा शॉक

Pune Airport: पुणे विमानतळ धावपट्टीचे काम पावसाळ्यानंतरच; उन्हाळी हंगामामुळे दुरुस्ती लांबणीवर, ‘नोटम’ कालावधीत काम होणार!

जातीचा दाखला कैसा बनाया? सहर शेख अडचणीत, ४ कार्यालयांना फसवलं; नगरसेवकपद धोक्यात

Nirav Modi Extradition Update : नीरव मोदीला भारतात आणलं जाणार? CBIची टीम लंडनमध्ये

IPL 2026: मुंबई इंडियन्सचं टेन्शन आणखी वाढणार... रोहित शर्मा MI vs PBKS मॅच खेळणार की नाही? जाणून घ्या काय आहे अपडेट

SCROLL FOR NEXT