मुंबई

नाट्य रसिकहो, कल्याण आयोजित राज्यस्तरीय अभिवाचन स्पर्धा संपन्न

CD

राज्यस्तरीय स्पर्धेत ‘मोर्चा’ कथेचा डंका
कल्याणमध्ये रंगला साहित्याचा सोहळा
कल्याण, ता. २३ (वार्ताहर) : नाट्यरसिकहो आयोजित राज्यस्तरीय कथा साहित्य अभिवाचन स्पर्धेत इरसाल स्टोरीटेलर्स यांनी सादर केलेल्या ‘मोर्चा’ या कथेचे अभिवाचन प्रथम क्रमांकाचे मानकरी ठरले. कल्याणमधील आचार्य अत्रे रंगमंदिर येथील कॉन्फरन्स हॉलमध्ये या स्पर्धेचा पारितोषिक वितरण समारंभ पार पडला.
याप्रसंगी नगरसेविका आर्या नाटेकर, ज्येष्ठ साहित्यिक व रंगकर्मी भिकू बारस्कर, नाट्य परिषद मध्यवर्ती शाखेचे कार्यकारिणी सदस्य शिवाजी शिंदे, नाट्य परिषद कल्याण शाखेचे अध्यक्ष रवींद्र सावंत, बालरंगभूमी परिषद कल्याण अध्यक्षा सुजाता डांगे, ज्येष्ठ अभिनेते राम दौंड, आनंद जाधव, सुधीर चित्ते, डॉ. प्रदीप सरवदे, किरण डांगे आणि राष्ट्रवादी सांस्कृतिक विभागाचे ठाणे जिल्हाध्यक्ष हेमंत यादगिरे उपस्थित होते.
या राज्यस्तरीय कथा साहित्य अभिवाचन स्पर्धेसाठी मुंबई, पुणे, नाशिक ठाणे आणि कल्याण-डोंबिवलीमधील एकूण २३ संघांचा सहभाग होता. यातील इरसाल स्टोरीटेलर्स यांच्या ‘मोर्चा’ला प्रथम क्रमांक मिळाला, तर पुण्यातील ज्ञान वैखरी या संस्थेने सादर केलेल्या ‘ज्ञान तेच देव’ या कथा अभिवाचनास द्वितीय क्रमांकाचे आणि प्रायोगिक रंगमंच संघाच्या ‘राडा’ या कथा अभिवाचनास तृतीय क्रमांक जाहीर झाला आहे. स्टुडिओ- ६४ या संस्थेच्या ‘डियर फादर’, सुमंगल फाउंडेशन संस्थेच्या ‘गुडघ्याएवढ्या महापुराची कहाणी’ व प्रायोगिक रंगमंच संघ यांच्या ‘बेईमान’ या कथा अभिवाचनाला सांघिक उत्तेजनार्थ क्रमांक जाहीर झाला असल्याचे नाट्यरसिकहोचे अध्यक्ष व प्रमुख आयोजक सुरेश पवार यांनी सांगितले.
सुरेश पवार म्हणाले, की यंदाचे या स्पर्धेचे हे सातवे वर्ष आहे. यंदाचा प्रतिसाद हा अधिक सुखावह असल्याने यापुढे ही स्पर्धा अधिकाधिक आकर्षक व दर्जेदार करण्यासाठी निश्चितच कटिबद्ध राहू. याप्रसंगी अभिनेते सुधाकर वसईकर, अविनाश साळवी, विशाल राऊत, नीलेश शास्त्री, किरण खांडगे, माणिक शिंदे, सीताराम शिंदे, महेश जोशी, हेमंत कर्णिक, डोंगरे आदी मान्यवर उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Char Dham Yatra 2026 : चारधाम यात्रेदरम्यान मोबाईवर बंदी, पूजा-अर्चा, विधीचे शुल्कही वाढले, जाणून घ्या नवे नियम

MI vs PBKS Live: रोहित शर्माची माघार! मुंबई इंडियन्सच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये दोन बदल, सलामीला कोणती जोडी?

Ganesh Naik : वाघ-बिबट्यांच्या शिकारीमागे आंतरराष्ट्रीय जाळे; वनमंत्री गणेश नाईक यांचा गौप्यस्फोट

RTE Admission Issue : वसईत आरटीई प्रवेशावरून गोंधळ; टोकन न मिळाल्याने पालकांमध्ये संताप, भर उन्हात पालकांच्या लांबचलांब रांगा

Latest Marathi News Live Update : टीसीएस प्रकरणात आरोपींना तीन दिवसांची पोलीस कोठडी

SCROLL FOR NEXT