मुंबई

होळीसाठी सावरीच्या झाडांची तोड टाळा

CD

होळीसाठी सावरीच्या झाडांची तोड टाळा
पर्यावरणपूरक सण साजरा करण्याचे वन विभागाचे आवाहन; वृक्षप्रेमींची जनजागृती
पेण, ता. २३ (वार्ताहर) : कोकणासह रायगड जिल्ह्यात होळीचा सण पारंपरिक उत्साहात साजरा केला जातो; मात्र या सणासाठी सावरीसह इतर जिवंत झाडांची होणारी तोड पर्यावरणासाठी घातक ठरत असल्याने ती तत्काळ थांबवावी, अशी मागणी वृक्षप्रेमी संघटनांकडून होत आहे. येत्या २ मार्च रोजी होलिकोत्सव साजरा होणार असून, अनेक गावांमध्ये होळीसाठी जंगलातील मोठी झाडे तोडण्याची प्रथा अद्याप सुरू आहे. यामुळे ऑक्सिजन, सावली आणि जैवविविधतेवर विपरीत परिणाम होत असल्याची चिंता व्यक्त केली जात आहे.
महाराष्ट्रातील बहुतांश जिल्ह्यांत होळी साजरी करताना सुक्या लाकडांचा, पालापाचोळ्याचा, शेण्या-गवऱ्यांचा वापर केला जातो; परंतु पेण तालुक्यासह काही आदिवासी भागांत सावरी, आंबा, जांभूळ, औदुंबर यांसारखी जिवंत झाडे तोडून होळी केली जाते. ही परंपरा पर्यावरणाच्या दृष्टीने हानिकारक असून, नागरिकांनी ती टाळावी, असे आवाहन वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी केले आहे. “होळी म्हणजे वाईट प्रवृत्तींचा त्याग करून चांगल्या विचारांचा स्वीकार करण्याचा सण आहे; झाडे तोडणे ही परंपरेची खरी भावना नाही,” असे वन विभागाच्या सपना सोनार यांनी सांगितले.
प्रा. उदय मानकवळे यांसारखे वृक्षप्रेमी नागरिकांत जनजागृती करत असून, सुक्या व पर्यायी साहित्याचा वापर करून होळी साजरी करण्याचा संदेश देत आहेत.

चौकट
पर्यावरणपूरक होळीची गरज का?
वाढते तापमान, कमी होत चाललेले जंगलक्षेत्र आणि प्रदूषण यामुळे पर्यावरणाचा समतोल ढासळत आहे. अशा परिस्थितीत प्रत्येक झाड महत्त्वाचे ठरत असून, होळीसाठी जिवंत झाडे तोडणे म्हणजे भविष्यातील पिढ्यांच्या हक्कावर गदा आणणे होय. सुक्या लाकडांचा वापर, सामूहिक होळी, कमी धूर निर्माण करणारे साहित्य आणि वृक्षारोपणाचा संकल्प यांमुळे सणाचा उत्साहही टिकून राहील आणि पर्यावरणाचे संरक्षणही होईल, अशी भूमिका वन विभाग व पर्यावरणप्रेमींनी मांडली आहे.

कोट
पेण तालुक्यात होळी सण साजरा करत असताना कोणीही सावरीच्या झाडासह इतर मोठ मोठ्या झाडांची तोड करू नये. यामुळे पर्यावरणाचा फार मोठा ऱ्हास होत असून, जंगल समृद्धी नष्ट होत चालली आहे. या सर्व गोष्टी टिकवण्यासाठी नागरिकांनी आनंदी आणि उत्साहाने पर्यावरणपूरकच होळी साजरी करावी.
सपना सोनार- अधिकारी वन विभाग पेण

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bhaskar Jadhav: 'कुठेतरी घातपात झालाय, असंच वाटतंय'! अजितदादांच्या विमान अपघातावर भास्कर जाधव महत्वाचे बोलले

Stock Market Today: शेअर बाजार तेजीत बंद! मात्र IDFC First Bank आणि TCS ला मोठा धक्का; कोणते शेअर्स तेजीत?

Crime: भयंकर! फक्त ३० सेकंद, २७ वेळा चाकूने वार अन्...; अल्पवयीन तरुणांचं दहावीच्या विद्यार्थ्यासोबत क्रूर कृत्य, कारण काय?

Malegaon News : मालेगावचा पाणी अहवाल समोर! वर्षभरात २ हजार नमुन्यांची तपासणी, ८२ ठिकाणी आढळले दूषित पाणी

Latest Marathi News Live Update : लातूरच्या पोहरेगाव परिसरात गारांचा पाऊस, शेती पिकांचे मोठं नुकसान

SCROLL FOR NEXT