मुंबई

ट्रकच्या धडकेत तरुणाचा मृत्यू

CD

नवी मुंबई (वार्ताहर) : दिवा येथून महापे येथे कामावर येणाऱ्या तरुणाच्या मोटारसायकलला भरधाव ट्रकने धडक दिल्याने झालेल्या अपघातात शिवम शिवकुमार जैस्वाल (वय २२) याचा मृत्यू झाला. तुर्भे पोलिसांनी ट्रकचालकाविरोधात गुन्हा दाखल करून त्याला ताब्यात घेतले आहे.

शिवम हा दिवा पूर्व भागात राहत होता. तसेच तो महापे येथील एका खासगी कंपनीत कामाला होता. रविवारी (ता. २२) सकाळी १०.३० वाजण्याच्या सुमारास तो मोटारसायकलवरून कामावर जाण्यासाठी निघाला होता. ११ वाजण्याच्या सुमारास शिळफाटा-महापे रस्त्याने जात असताना, महापे येथील एल ॲण्ड टी पुलाखालून इंदिरानगर तुर्भे एमआयडीसीच्या दिशेने तो वळण घेत होता. त्याचवेळी ऍपे सर्व्हिस सेंटरसमोर पाठीमागून येणाऱ्या ट्रकने त्याला धडक दिली. या अपघातात शिवम ट्रकच्या मागील चाकाखाली चिरडला गेल्याने त्याचा मृत्यू झाला. या घटनेनंतर पोलिसांनी ट्रकचालक अजय जैस्वाल (वय ३४) याला ताब्यात घेतले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

RTE Admission Rule : 'आरटीई'चा नवा नियम विद्यार्थ्यांच्या मुळावर! १ किमीच्या अटीमुळे हजारो गरीब मुले शिक्षणापासून वंचित राहण्याची भीती

Satana News : सटाणा शहराचा होणार कायापालट; २६ मीटर रुंदीचा काँक्रीट रस्ता आणि कायमस्वरूपी अतिक्रमण विरोधी पथक सज्ज

का मोडलेला रिमा लागू यांचा संसार? एकटेपणा आणि लोकप्रियतेच्या शिखरावर असतानाच घेतलेला घटस्फोट

Latest Marathi News Live Update : बोरिवलीतील MHB कॉलनी परिसर झाला नशेचा अड्डा, भाजप नगरसेवकाची धाड

T20 World Cup: संजू सॅमसनला संधी मिळणार? पण, त्यासाठी अभिषेकसह तीन खेळाडू रडारवर; कोणाची विकेट पडणार?

SCROLL FOR NEXT