मुंबई

भय इथले संपत नाही

CD

आणखी किती अपघातांची प्रतीक्षा?
द्रुतगती महामार्गावर उपाययोजनांकडे कानाडोळा
मनोज कळमकर : सकाळ वृत्तसेवा
खालापूर, ता. २३ : द्रुतगती महामार्गावरून पुण्याहून मुंबईच्या दिशेने येताना उतार असल्याने इंधनबचतीसाठी अनेक अवजड वाहनचालक त्यांचे वाहन बंद वा न्यूट्रल करतात; परंतु बोरघाटातील तीव्र वळणावर आणि उतारावर अचानक ब्रेक लावताना चालकांचे वाहनावरील नियंत्रण सुटून अपघात होतात. ३ फेब्रुवारी रोजीदेखील याच कारणास्तव आडोशी बोगद्याजवळ टँकर उलटून महामार्ग ४० तास ठप्प झाला होता. त्यातून कोणताही धडा न घेतल्याने तसेच प्रभावी उपाययोजना न केल्याने, सोमवारी (ता. २३) पुन्हा एकदा याच प्रकारे अत्यंत ज्वलनशील प्रोपेलिन गॅस टॅंकरचा मोठा अपघात थोडक्यात टळला.
मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर ३ फेब्रुवारी रोजी झालेल्या गॅस टँकरच्या अपघातामुळे दोन दिवस वाहतूक ठप्प झाली होती. अन्न-पाण्यावाचून प्रवाशांचे प्रचंड हाल झाले, पुरवठा साखळीवर परिणाम झाल्याने कोट्यवधींची उलाढाल ठप्प झाली होती. आपत्कालीन स्थितीत कार्यवाहीसाठी संबंधित यंत्रणा सक्षम नसल्याचे सिद्ध झाले. परिवहनमंत्री प्रताप सरनाईक यांनी याबाबत आढावा घेतला; मात्र प्रत्यक्षात द्रुतगती मार्गावर जाऊन उपाययोजनांबाबत नियोजन न केल्याने सोमवारी (ता. २३) पुन्हा एकदा टँकरचा अपघात घटना घडली. अमृतांजन पुलाजवळ अपघात झालेला भाग हा तीव्र वळणाचा आणि प्रचंड उताराचा आहे. या ठिकाणी वारंवार अपघात होत असल्याने पाच वर्षांपूर्वी ब्रिटिशकालीन पूल तोडून महामार्ग रुंद करण्यात आला, परंतु त्याचा अपेक्षित परिणाम जाणवत नाही. या वळणावर डिसेंबर महिन्यात अपघात होऊन चालक जागीच ठार झाला होता. या आधीदेखील अवजड यंत्रसामग्री घेऊन जाणारा ट्रेलर याच ठिकाणी अनियंत्रित होऊन विरुद्ध दिशेच्या मार्गिकेत शिरला होता.
--------------------------------
वाहनतपासणीची यंत्रणाच नाही!
जुना मुंबई-पुणे राष्ट्रीय महामार्ग असताना खंडाळा घाटातून जाणाऱ्या वाहनचालकांची तपासणी होत होती; मात्र सध्या द्रुतगती मार्गावर अवजड वाहनांसह चालकांची तपासणी करण्याची कोणतीही यंत्रणा उपलब्ध नाही. नियम मोडणाऱ्या अवजड वाहनचालकांवर केवळ दंडात्मक कारवाईच नव्हे, तर प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्याची आवश्यकता यानिमित्ताने निर्माण झाली आहे.
-------------------
अपघातांची आकडेवारी
वर्ष अपघात मृत्यू जखमी
२०१३ १९८ ४९ ९१
२०१४ २११ ५३ ९६
२०१५ २०३ ६३ ४५
२०१६ १३१ ३८ ७०
२०१७ १६८ ४३ ९७
२०१८ १९२ ३६ ७८
२०१९ २२० ४० १४४
२०२० १०१ ३० ६३
२०२१ १३८ ५४ ७३
२०२२ ११७ ४८ ९४
२०२३ ८५ २५ ३८
२०२४ ४८ ३५ ७०
२०२५ ४० २५ ६०


फोटो-अमृतांजन पुलाजवळ या अगोदर घडलेले अपघात.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Yavatmal News : जिल्हा परिषद कर्मचार्‍यांच्या बदल्या एप्रिलमध्ये होणार; सीईओंचे गटविकास अधिकार्‍यांना पत्र

Congress spokesperson assaulted Video : काँग्रेस प्रवक्त्यास पुण्यात मारहाण!, प्रदेशाध्यक्ष सपकाळांनी ट्वीट केला घटनेचा व्हिडिओ

टी-२० विश्वचषक सामन्यावर सट्टेबाजी! स्थानिक गुन्हे शाखेच्या विशेष पथकाने केली कठोर कारवाई

T20 WC, WI vs ZIM: ७ चौकार, ७ षटकार... वानखेडेवर हेटमायरचं वादळ; झिम्बाब्वेच्या गोलंदाजांना झोडपत विंडीजसाठी रचला वर्ल्ड रेकॉर्ड

Latest Marathi News Update: दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी वाचा एका क्लिकवर...

SCROLL FOR NEXT