मुंबई

खेळाचे मैदान झाले वाहनतळ

CD

खेळाचे मैदान झाले वाहनतळ
पालिकेच्या दुर्लक्षामुळे खारघर सेक्टर १२ मधील मुलांच्या खेळाच्या जागेवर अतिक्रमण
खारघर, ता. २३ (बातमीदार) : खारघर सेक्टर १२ येथील संजीवनी हॉस्पिटलसमोरील सार्वजनिक खेळाचे मैदान सध्या अनधिकृत वाहनतळामध्ये रूपांतरित झाल्याचा प्रकार समोर आला असून, रहिवाशांमध्ये संतापाचे वातावरण आहे. परिसरातील मुलांसाठी सिडकोने राखीव ठेवलेल्या या मैदानात पूर्वी ग्रामपंचायत असताना विविध खेळणी बसविण्यात आली होती. त्यामुळे हे मैदान स्थानिकांसाठी एकमेव विरंगुळ्याचे ठिकाण ठरले होते. दरम्यान, दोन वर्षांपूर्वी मैदानाच्या एका बाजूला राम जानकी मंदिर उभारण्यात आले. आता मात्र मैदानावर चारचाकी व दुचाकी वाहनांच्या रांगा लागल्याने खेळण्यासाठी जागाच उरलेली नाही.
वाहनांमुळे मैदानाची हानी होत असून, मुलांच्या सुरक्षिततेचा प्रश्नही निर्माण झाला आहे. याबाबत ईश फाउंडेशनच्या अध्यक्षा कीर्ती मेहरा यांनी पालिकेकडे लेखी पाठपुरावा केला असतानाही कोणतीही कारवाई झालेली नाही. यामुळे पालिका प्रशासन डोळेझाक करत असल्याची भावना नागरिकांमध्ये आहे. लवकरात लवकर अतिक्रमण हटवून मैदान पूर्ववत करावे अन्यथा आंदोलन छेडण्याचा इशारा स्थानिकांनी दिला आहे.

चौकट
मुलांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर
सार्वजनिक सुविधांचे जतन करणे ही पालिकेची जबाबदारी असून, मुलांना खेळण्यासाठी सुरक्षित व मोकळी जागा मिळणे अत्यावश्यक आहे. मैदानावर उभ्या राहणाऱ्या वाहनांमुळे अपघाताचा धोका वाढत आहे. त्यामुळे तातडीने कारवाई करून मैदान वाहनमुक्त करावे, अशी जोरदार मागणी नागरिकांकडून होत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Son kills mother Sangli : बायकोसाठी मुलाने आईचा गळा दाबला, मृतदेहाशेजारीच रात्रभर झोपला अन्...; नंतर आई आईचा आक्रोश

Jal Jeevan Mission: राज्याचे ‘जलजीवन’ निधीच्या प्रतीक्षेत; २४ हजार योजनांची कामे ठप्प, केंद्राकडून केवळ साडेबारा कोटी मिळाले..

Latest Marathi News Live Update : IT कंपनीतील धर्मांतरप्रकरणी राष्ट्रीय महिला आयोगाची टीम आज नाशिकमध्ये येणार

Akola News: नुकसान भरपाईचा खेळखंडोबा; प्रीमियमच्या बदल्यात निराशा; पिक विमा योजना शेतकऱ्यांसाठी कागदोपत्रीच

America-Iran War: युद्ध थांबणार! अण्वस्त्रांसंबंधीची सर्वात मोठी अट इराणने केली मान्य; अमेरिकेचा दावा

SCROLL FOR NEXT