मुंबई

किरकोळ कारणावरून बेदम मारहाण

CD

वज्रेश्वरी, ता. २३ (बातमीदार) : पडघा परिसरात २० फेब्रुवारीला सायंकाळी सहा वाजण्याच्या सुमारास किरकोळ कारणावरून झालेल्या वादातून एका व्यक्तीला बेदम मारहाण केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, मनेश पाटील (वय ३५) हे नवीन घराच्या बांधकामासाठी स्लॅब व अन्य साहित्य खरेदीसाठी कारने शेडगावकडे जात होते. किरवली गावाच्या फाट्याजवळ रस्ता अरुंद असल्याने त्यांच्या कारचा कट कैलास पाटील व विनायक शिंदे यांच्या दुचाकीला लागल्याचे कारण पुढे करत शाब्दिक वाद झाला. त्यानंतर शिंदे यांनी शिवीगाळ करत मनेश पाटील यांना ठोशाबुक्क्यांनी मारहाण केल्याचा आरोप आहे. तसेच कैलास पाटील यांनी दांडक्याने मारहाण करून त्यांना जखमी केल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे. या मारहाणीमध्ये मनेश पाटील गंभीर जखमी झाले. घटनेनंतर त्यांनी तत्काळ पडघा पोलिस ठाण्यात धाव घेत तक्रार दाखल केली. आरोपींनी मारहाण करून जीवे मारण्याची धमकी दिल्याचेही तक्रारीत नमूद आहे. याप्रकरणी पडघा पोलिस ठाण्यात कैलास पाटील व विनायक शिंदे यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरू आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Rohit Pawar: ''..तोपर्यंत मी शर्टचं वरचं बटण लावणार नाही'', विधानसभेत रोहित पवारांना अश्रू अनावर

भाजपच नाही, सोनिया गांधींनीही शब्द दिला होता! २०२७ पूर्वी विदर्भ वेगळा होणार, विदर्भ राज्य आंदोलन समितीने व्यक्त केला विश्वास

आम्ही आमचं बाळ गमावलं... लोकप्रिय मराठी इन्फ्लूएन्सर कपलला धक्का; म्हणाले- ५ व्या महिन्यात समजलं की...

Meat And Fish Ban: मांस आणि माशांच्या खुल्या विक्रीवर बंदी! आता परवानगी असेल तरच दुकान चालणार; राज्य सरकारची मोठी घोषणा

Mumbai: मुंबईतील हवा ‘भीषण’ स्तरावर; बांधकामांना आठवडाभर स्थगितीची मागणी; पालिका आयुक्तांना दिलेल्या पत्रात काय लिहिलंय?

SCROLL FOR NEXT