मुंबई

डम्पर्सचा दिवस-रात्र धुमाकूळ

CD

डम्परचा दिवस-रात्र धुमाकूळ
वाहतूक कोंडीने आगरवाडीकर त्रस्त, प्रशासनाकडे कारवाईची मागणी

मनोर, ता. २३ (बातमीदार) : पालघर तालुक्यातील सफाळे पश्चिमेकडील आगरवाडी परिसरात सध्या माती वाहतूक करणाऱ्या अवजड डम्परच्या वाढत्या व अव्यवस्थित वाहतुकीमुळे नागरिक त्रस्त झाले आहेत. विशेषतः शनिवार व रविवार दिवस-रात्र येथे सुरू असलेल्या डम्परच्या वाहतुकीमुळे गावात वारंवार वाहतूक कोंडी होत असून, सामान्य नागरिकांना मोठा मनस्ताप सहन करावा लागत आहे.
स्थानिकांच्या माहितीनुसार, रात्री उशिरापर्यंत माती वाहतूक करणारे डम्पर गावातून वेगाने जातात. यातील काही माती वाहतूक ही विनापरवानगी किंवा आवश्यक कागदपत्रांशिवाय होत असावी, अशी शंका येथील ग्रामस्थांना आहे. याबाबत महसूल विभागाने कारवाई करावी अशी मागणीही आगारवाडीतल्या नागरिकांकडून होत आहे. सध्या लग्नसराईचा हंगाम सुरू असल्याने गावातून व बाहेरून ये-जा करणाऱ्या वाहनांची संख्या वाढली आहे. अशा परिस्थितीत अवजड वाहनांच्या सततच्या ये-जामुळे अरुंद रस्त्यावर प्रचंड वाहतूक कोंडी निर्माण होत आहे. रात्रीच्या वेळीही हीच परिस्थिती कायम असल्याने आपत्कालीन सेवा, रुग्णवाहिका तसेच इतर वाहनचालकांनाही अडचणींना सामोरे जावे लागत आहे.
-----------
त्वरित कारवाईची मागणी
गावकऱ्यांनी संबंधित प्रशासन व महसूल विभागाने तत्काळ दखल घेऊन अवैध माती वाहतुकीवर कारवाई करावी, अशी मागणी केली आहे. तसेच रात्रीच्या वेळेत अवजड वाहनांवर निर्बंध घालावेत आणि नियमित तपासणी मोहीम राबवावी, अशीही मागणी होत आहे. दरम्यान, या प्रकारामुळे गावातील रस्त्यांचीही मोठ्या प्रमाणात झीज होत असून, अपघाताचा धोका वाढला आहे. प्रशासनाने त्वरित कारवाई करून नागरिकांना दिलासा द्यावा, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली आहे.


-- कोट
आगरवाडी गावातून मोठ्या प्रमाणात मातीवाहू अवजड डम्पर जात आहेत. दिवस-रात्र या गाड्या जात असल्याने वाहतूक कोंडीचाही सामना करावा लागतो. त्यातच दहावी-बारावीचे आगरवाडी हे परीक्षा केंद्र असल्याने विद्यार्थ्यांनाही मोठ्या अडचणीचा सामना करावा लागत आहे.
-जय पाटील, आगरवाडी सरपंच


रात्री उशिरा अवजड वाहनांची वर्दळ असते. मध्यरात्री ३-४ वाजतासुद्धा चालूच असतात. आगरवाडीहून एडवण, दातिवरे, कोरे इत्यादी गावे जोडली असल्याने तेथील नागरिक, विद्यार्थी सर्वांनाच खूप त्रास होत असून, वाहतूक कोंडी होत आहे. १२ वीच्या परीक्षा सुरू असल्यामुळे विद्यार्थ्यांची गैरसोय होत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

पगार वाढल्याशिवाय कामावर नाही येणार, कामगार ठाम; जाळपोळ आणि तोडफोड सुरूच, ७ FIR, ३०० जण ताब्यात

Kolhapur Danoli Crime : कोल्हापुरातील दानोळीमध्ये अपहरण करून खून, २५ लाखांची मागणी, भरतेशचा कारण नसताना बळी, घटनास्थळी आमदार यड्रावकर दाखल

Pune Crime: हवेली तालुक्यात जमिनीच्या वादातून शेतकऱ्यावर जीवघेणा हल्ला; परस्पर विरोधात फिर्याद, ८ जणांविरुद्ध गुन्हा!

Latest Marathi News Update: नेस्कमधील कॉन्सर्टचा आणखी एक व्हिडिओ समोर, अनेकांनी ड्रिंक अँड ड्राईव्ह केल्याचा ही अंदाज

Pune Solapur flight: पुण्याहून सोलापूर आता ४० मिनिटांत पोहोचणे शक्य होणार; १ मेपासून स्टार एअरची विमानसेवा, नवीन स्लॉट मंजूर!

SCROLL FOR NEXT