विहिरीतून बॅट काढण्यासाठी
गेलेल्या तरुणाचा मृत्यू
भिवंडी, ता. २३ (वार्ताहर)ः क्रिकेटची बॅट विहिरीत पडल्याने ती काढण्यासाठी गेलेल्या तरुणाचा बुडून दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना समरूबाग परिसरात रविवारी (ता. २२) घडली. बिलाल अन्सारी (२५) असे विहिरीत बुडून मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव आहे. या घटनेनंतर समरूबाग परिसरात शोककळा पसरली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, बिलाल याच्या घराच्या शेजारी असलेल्या एका कंपनीच्या कंपाउंडमध्ये जुनी विहीर आहे. काही दिवसांपूर्वी बिलालची क्रिकेट बॅट चुकून त्या विहिरीत पडली होती. दरम्यान, रविवारी (ता. २२) तो बॅट काढण्यासाठी विहिरीत उतरला असताना अपघात घडल्याची प्राथमिक माहिती देण्यात आली आहे. या घटनेची माहिती मिळताच स्थानिक नागरिकांनी पोलिसांना घटनेची माहिती दिल्यानंतर, भोईवाडा पोलिसांनी घटनास्थळी दाखल होत मृतदेह पाण्याबाहेर काढून येथील इंदिरा गांधी रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठवला आहे. या घटनेची नोंद भोईवाडा पोलिस ठाण्यात करण्यात आली असून, पोलिस या घटनेचा अधिक तपास करत आहेत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.