‘तंत्रशिक्षण’च्या मराठीतील पदविका अभ्यासक्रमांचा गौरव
राज्यपालांच्या अभिभाषणात उल्लेख
मुंबई, ता. २३ : राज्यपाल आचार्य देवव्रत यांनी आपल्या अर्थसंकल्पीय अभिभाषणात राज्याच्या तंत्रशिक्षण संचालनालयाअंतर्गत येणाऱ्या राज्य तंत्रशिक्षण मंडळाच्या मराठी भाषेतून शिकवल्या जाणाऱ्या पदविका (पॉलिटेक्निक) अभ्यासक्रमांचा गौरव केला.
उच्च व तंत्रशिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या पुढाकारामुळे आणि संचालनालयाने केलेल्या विविध प्रकारच्या नियोजनामुळे राज्यात पहिल्यांदाच तंत्रशिक्षण मंडळाकडे उपलब्ध असलेल्या पदविकेचे तब्बल सर्व १५४ विषयांचे शिक्षण मराठीतून अनुवादित अभ्यासक्रम उपलब्ध करून देण्यात येतो. यामुळे काही वर्षांत या पदविका अभ्यासक्रमांच्या प्रवेशांत मोठी वाढ झाली आहे. याच पार्श्वभूमीवर राज्यपालांनी या पदविका अभ्यासक्रमांची दखल घेतली. तंत्रशिक्षण विभागाने त्याचे स्वागत केले आहे.
राज्यपालांनी अभिभाषणात मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्याच्या पार्श्वभूमीवर ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना तंत्रशिक्षणाची आवड निर्माण व्हावी याकरिता महाराष्ट्र राज्य तंत्रशिक्षण मंडळामार्फत पदविका अभ्यासक्रमासाठी आवश्यक असलेल्या सर्व १५४ विषयांचे संपूर्ण शैक्षणिक साहित्य मराठी भाषेत अनुवादित करण्यात आले आहे. राज्यातील १९२ संस्थांत मराठी व इंग्रजीतून शिक्षण देण्यात येते. अशा संस्थांमध्ये प्रवेश घेतलेल्या मराठी भाषेतून शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या ४५,४४४ म्हणजेच एकूण प्रवेश घेतलेल्या १,०७,९१० विद्यार्थीसंख्येच्या साधारणतः ४२ टक्के इतकी असल्याचे सांगून विभागाच्या कार्याचा राज्यपालांनी आवर्जून उल्लेख केला.
–
सीईटीबाबतच्या निर्णयाचे काैतुक
राज्य सीईटी सेलने एका वर्षात दोन वेळा सीईटी घेण्याचा निर्णय घेतल्याने विद्यार्थ्यांच्या परीक्षेतील अनुपस्थिती अथवा इतर अपेक्षित कामगिरी न झाल्याने होणारे शैक्षणिक वर्षाचे नुकसान टाळण्यास मोठा लाभ होणार आहे. त्याचाही अभिभाषणात राज्यपालांनी आवर्जून उल्लेख केला.
–
विद्यार्थ्यांच्या मानसिक आरोग्याला प्राधान्य
राज्यपालांनी विद्यार्थ्यांच्या मानसिक आरोग्याला प्राधान्य देण्यासाठी ‘महाराष्ट्र विद्यार्थी सुरक्षा, संरक्षण व मानसिक कल्याण धोरण, २०२५’ स्वीकारून सर्व विद्यापीठांना विद्यार्थ्यांच्या आत्महत्या रोखण्यासाठी उपाययोजना करण्यास प्राधान्य देण्याचे निर्देश दिल्याचेही आपल्या अभिभाषणात सांगितले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.