प्रमुख आरोग्य संस्थांची संख्या
एकूण ३,६०८ आरोग्य संस्थांची माहिती उपलब्ध आहे.
प्राथमिक आरोग्य केंद्र : २,२००
ग्रामीण रुग्णालय : ३६९
नागरी आरोग्य केंद्र : ३५०
आपला दवाखाना : २५०
उपजिल्हा रुग्णालय : ७४ रुग्णालये (५० आणि १०० खाटांची मिळून)
जिल्हा रुग्णालय : २७
स्त्री रुग्णालय : २२
मानसोपचार संस्था (ठाणे, पुणे, नागपूर, रत्नागिरी, बीड) : ५
क्षयरोग रुग्णालये (कोल्हापूर, पुणे, अमरावती, बुलडाणा, शिवडी मुंबई) : ५
आरोग्य संस्था स्थापन करण्याचे निकष
आरोग्य केंद्रे
बिगर आदिवासी क्षेत्रातील लोकसंख्या : ३०,०००
आदिवासी क्षेत्रातील लोकसंख्या : २०,०००
उप केंद्र :
बिगर आदिवासी भागातील लोकसंख्या : ५,०००
आदिवासी भागातील लोकसंख्या : ३,०००
ग्रामीण रुग्णालय :
दर ४ ते ५ प्राथमिक आरोग्य केंद्रांमागे एक ग्रामीण रुग्णालय
ग्रामीण रुग्णालयांचे स्वरूप :
३० खाटांचे संदर्भीय रुग्णालय असते, जिथे स्त्रीरोगतज्ज्ञ, बालरोगतज्ज्ञ आणि भूलतज्ज्ञ यांसारखे तज्ज्ञ उपलब्ध असतात.
महत्त्वाचे हेल्पलाईन क्रमांक
आरोग्य सल्ला व माहिती : १०४
रुग्णवाहिका सेवा : १०८
गर्भवती महिला व बालक वाहतूक : १०२
प्रधानमंत्री मातृवंदना योजना मदत : १४४०८
जन आरोग्य योजना : १५५३८८ / १८००२३३२२००
टेली मानस सेवा : १४४१६
प्रमुख आरोग्य योजना आणि सुधारणा
महात्मा जोतिराव फुले जन आरोग्य योजना विस्तार : १० लाखांपर्यंत मोफत उपचाराची हमी
उपचारांच्या संख्येत वाढ : ९९६ वरून १,३५६
तज्ज्ञ सेवांची व्याप्ती : ३४ वरून ३८ विभागांपर्यंत
(ही योजना आता बृहन्मुंबई महापालिकेसह राज्यातील सर्व महापालिका रुग्णालयांत आणि महाराष्ट्र राज्य कामगार विमा सोसायटीच्या रुग्णालयांतही लागू केली आहे.)
आयुष्यमान भारत - प्रधानमंत्री जन आरोग्य योजना
आयुष्यमान को-ब्रँडेड कार्डे : ३.४४ कोटी
पूर्ण करण्याचे लक्ष : ९.३० कोटी
कर्मचाऱ्यांच्या मानधनात वाढ : ३० रुपये (प्रति कार्ड)
लॅब ॲक्ट : खासगी प्रयोगशाळांमधील चाचण्यांमध्ये अचूकता, पारदर्शकता आणि गुणवत्ता सुनिश्चित करण्यासाठी लॅब ॲक्ट लागू
महत्त्वाच्या मोहिमा आणि आकडेवारी
राज्यस्तरीय कर्करोग तपासणी व जनजागृती मोहीम
२ कोटी ९२ लाख : एकूण महिलांची तपासणी
ॲनिमिया : ५८ लाख ७४ हजार तपासणी; सात लाख सात हजार निदान
उच्च रक्तदाब : एक कोटी ४९ लाख तपासणी; ११ लाख २१ हजार निदान
मधुमेह : एक कोटी ३१ लाख तपासणी; पाच लाख ६० हजार निदान
स्तन कर्करोग : ८५ लाख ९९ हजार तपासणी; ४७१ निदान
गर्भाशयमुख कर्करोग : ६६ लाख ४९ हजार तपासणी; २४३ निदान
९,२३,५०९ : वारकऱ्यांना आषाढी वारी आरोग्य उपक्रमात मोफत आरोग्य तपासणी आणि औषधोपचाराचा लाभ
आषाढी वारी आरोग्यसेवा तपशील
एकूण लाभार्थी : ९,२३,५०९
मनुष्यबळ : ४,३७६ आरोग्य कर्मचारी
रुग्णवाहिका : ३३१ (१०२ व १०८ सेवा)
सुविधा : ४६ अतिदक्षता केंद्रे आणि ३,५०० औषध किटचे वितरण
नवीन आरोग्य आणि पायाभूत सुविधा
८ : मोबाईल व्हॅन कर्करोग तपासणीसाठी
८० : डिजिटल हँड-हेल्ड एक्स-रे मशिन्स
२ : सीटी स्कॅन मशीन
६ : डे-केअर केमोथेरपी सेंटर्स
३८४ : ‘१०२’ रुग्णवाहिका आणि सात ॲडव्हान्स लाईफ सपोर्ट रुग्णवाहिका
५९३ : शासकीय रुग्णालयांमध्ये यांत्रिक वस्त्र धुलाई सेवा
५० : बेडपर्यंतच्या सर्व सरकारी रुग्णालयांत दिव्यांग नागरिकांना प्रमाणपत्र उपलब्ध करून देण्याची सोय
कुटुंब नियोजनासाठी प्रोत्साहन भत्ता
१,४५१ रुपये : पुरुष नसबंदी
२५० ते ६०० रुपये : महिला नसबंदी
(दोन मुलांमध्ये तीन वर्षांचे अंतर राखण्यासाठी ‘अंतरा’ इंजेक्शन )
राष्ट्रीय क्षयरोग दुरीकरण कार्यक्रम
१,००० रुपये दरमहा आहार भत्ता (क्षयरोगाचे मोफत निदान आणि उपचार, नि:क्षय पोषण योजना)
राष्ट्रीय कुष्ठरोग निर्मूलन कार्यक्रम : कुष्ठरुग्णांसाठी मोफत शस्त्रक्रिया आणि पुनर्वसन सेवा उपलब्ध आहेत.
ॲनिमियामुक्त भारत : बालके, किशोरवयीन मुले-मुली आणि गरोदर मातांमधील रक्तक्षयाचे प्रमाण कमी करण्यासाठी लोह व फॉलिक ॲसिडच्या गोळ्या दिल्या जातात.
महत्त्वाच्या सेवा
लॅबोरेटरी सर्व्हिसेस : शासकीय आरोग्य संस्थांमध्ये रुग्णांच्या रोगनिदानासाठी विविध चाचण्या विनामूल्य.
राज्यात ३० खाटांची एकूण ३६४ ग्रामीण रुग्णालये कार्यरत आहेत.
आशा स्वयंसेविका : ग्रामीण व शहरी भागात आरोग्यविषयक जनजागृती आणि लसीकरण कार्यक्रमात महत्त्वाचा दुवा म्हणून काम करतात.
............................................
राष्ट्रीय वृद्धापकाळ आरोग्य शुश्रूषा कार्यक्रम
६० वर्षांवरील नागरिकांसाठी जिल्हा रुग्णालयात स्वतंत्र रांगा
१० खाटांचे स्वतंत्र वॉर्ड आणि आठवड्यातून एक दिवस खास वृद्धांसाठी ओपीडी
स्टेमी प्रकल्प :
३० मिनिटांच्या उपचार : हृदयविकाराचा झटका आल्यास गोल्डन अवरमध्ये तातडीने उपचार आणि थ्रोंबोलिसिससारख्या महागड्या सुविधा मोफत उपलब्ध करून दिल्या जातात.
अत्याधुनिक आरोग्यसेवा
ई-संजीवनी ओपीडी : रुग्ण घरबसल्या मोबाईलद्वारे तज्ज्ञ डॉक्टरांचा मोफत सल्ला आणि ई-प्रिस्क्रिप्शन
टेलिमेडिसीन प्रकल्प : दुर्गम भागातील रुग्णांना व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे तज्ज्ञ डॉक्टरांशी जोडून त्यांच्यावर उपचार केले जातात.
मोबाईल मेडिकल युनिट : ज्या दुर्गम भागात आरोग्य केंद्रे नाहीत तिथे रुग्णवाहिकेमार्फत प्राथमिक उपचार, लसीकरण आणि तपासणी सेवा पुरवल्या जातात.
पॅलिएटिव्ह केअर : दुर्धर आणि गंभीर आजाराने ग्रस्त रुग्णांना आणि त्यांच्या नातेवाइकांना वेदनामुक्तीसाठी सल्ला आणि शुश्रूषा पुरवली जाते.
इतर महत्त्वाच्या सुविधा
२३ रुग्णालयांत आयुष विंग कार्यरत आहेत.
(शासकीय रुग्णालयांत आयुर्वेद, योग, युनानी, सिद्ध आणि होमिओपॅथी या उपचार पद्धतींचा समावेश)
राष्ट्रीय किशोरवयीन आरोग्य
१० ते १९ वर्षे वयोगटातील मुलामुलींसाठी ‘मैत्री क्लिनिक’मार्फत समुपदेशन आणि लोह-फॉलिक ॲसिडच्या गोळ्यांचे वाटप.
मुस्कान उपक्रम
शासकीय रुग्णालयांमधील नवजात शिशु आणि बाल आरोग्यसेवा अधिक दर्जेदार आणि बालस्नेही बनवणे हे या उपक्रमाचे उद्दिष्ट आहे.
३५ प्रयोगशाळा
पिण्याच्या पाण्याची शुद्धता तपासणे, अन्न विषबाधेची चौकशी करणे आणि साथरोगांचे निदान करण्यासाठी राज्यात कार्यरत
लसीकरण आणि रक्त सुरक्षा
शासकीय केंद्रांवर बीसीजी, पोलिओ, गोवर, रुबेला, पेंटाव्हॅलंट आणि हिपॅटायटीस-बी यांसारख्या विविध आजारांवर मोफत लस
गर्भवती आणि गंभीर आजारी बालकांना उपचारासाठी निवासस्थानापासून रुग्णालयापर्यंत मोफत वाहतूक सेवा (१०२)
इतर महत्त्वपूर्ण निर्णय आणि माहिती
नो शॉर्टेज, नो वेस्टेज धोरण : रक्ताचा तुटवडा होऊ नये आणि अतिरिक्त रक्त वाया जाऊ नये, यासाठी रक्त बँकांसाठी विशेष धोरण
ई-सुश्रुत : आरोग्य व्यवस्थेतील डेटा व्यवस्थापन आणि रुग्णसेवा नोंदी डिजिटल करण्यासाठी या संकेतस्थळाचे विस्तारीकरण
नमो नेत्र संजीवनी आरोग्य अभियान : १७ सप्टेंबर ते २ ऑक्टोबर या कालावधीत राबवलेल्या या मोहिमेत नागरिकांची नेत्रतपासणी आणि मोफत मोतीबिंदू शस्त्रक्रिया.
तंत्रज्ञान आणि प्रशासकीय सुधारणा
ई-सुश्रुत विस्तार : राज्यातील आरोग्य व्यवस्थेतील डेटा व्यवस्थापन आणि रुग्णसेवा नोंदी अधिक पारदर्शक करण्यासाठी ई-सुश्रुत प्रणालीचे विस्तारीकरण केले जात आहे. यामुळे रुग्णांची माहिती सुरक्षित राहून तत्काळ निर्णय घेणे शक्य होईल.
लॅब ॲक्ट : राज्यातील खासगी प्रयोगशाळांवर नियंत्रण ठेवण्यासाठी आणि नागरिकांना अचूक चाचण्या मिळाव्यात यासाठी लॅब ॲक्टची अंमलबजावणी केली जात आहे.
औषधे व उपकरणे : सरकारी रुग्णालयांत औषधे आणि वैद्यकीय उपकरणांचा सुरक्षित आणि कार्यक्षम वापर सुनिश्चित करण्यासाठी मानक कार्यप्रणाली राबवण्यात येत आहे.
ई-सुश्रुतद्वारे दिव्यांग प्रमाणपत्र : आता ५० खाटांपर्यंतच्या सर्व सरकारी रुग्णालयांमध्ये दिव्यांग नागरिकांना प्रमाणपत्र मिळण्याची सोय उपलब्ध करून देण्यात आली आहे.
गर्भाशयमुख कर्करोग जनजागृती : ९ ते १४ वर्षे वयोगटातील शालेय मुलींसाठी विशेष जनजागृती अभियान
एक पाऊल थॅलेसेमियामुक्तीकडे : थॅलेसेमियाग्रस्त बालकांचा जन्म रोखणे आणि असलेल्या रुग्णांना तालुका स्तरावर रक्तसंक्रमणाची सुविधा देणे हे या अभियानाचे मुख्य उद्दिष्ट.
नमो नेत्र संजीवनी आरोग्य अभियान : १७ सप्टेंबर ते २ ऑक्टोबर या कालावधीत राबवलेल्या या मोहिमेत नागरिकांची मोफत नेत्रतपासणी आणि मोतीबिंदू शस्त्रक्रिया.
आशा स्वयंसेविका गुणवत्ता: आशा कौशल्य विकास कार्यक्रमांतर्गत राज्यातील विविध जिल्ह्यांतील आशा स्वयंसेविकांची कामगिरी तपासली जात आहे.
कंत्राटी कर्मचारी निर्णय : ज्या एनएचएम कंत्राटी कर्मचाऱ्यांनी १० वर्षे सेवा पूर्ण केली आहे, त्यांच्या नियमित पदांवरील समायोजनास शासनाने मंजुरी दिली आहे.
पायाभूत सुविधा
रक्त बँक धोरण : रक्ताचा तुटवडा रोखण्यासाठी ‘नो शॉर्टेज नो वेस्टेज’ हे धोरण राबवले जात असून, रक्त बँक व्यवस्थापनात अधिक पारदर्शकता आणली जात आहे.
मानसिक आरोग्य सुधारणा : राज्यातील प्रादेशिक मनोरुग्णालयांचा विकास ‘निन्हान्स’च्या धर्तीवर केला जात असून, तिथे नवीन थेरपी आणि पुनर्वसन सेवा सुरू करण्यात येत आहेत.
नवीन प्रयोगशाळा : औषधांची गुणवत्ता तपासण्यासाठी पुणे, छत्रपती संभाजीनगर आणि नागपूर येथे प्रादेशिक प्रयोगशाळा आणि पुणे येथे आरटी-पीसीआर रेण्वीय चाचणी सुविधेची निर्मिती केली जात आहे.
यांत्रिक वस्त्र धुलाई : राज्यातील ५९३ रुग्णालयांमध्ये ही सेवा सुरू केल्यामुळे रुग्णालयातील स्वच्छता आणि निर्जंतुकीकरण दर्जा सुधारला आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.