मुंबई

घोरपडे मैदान ‘जयभीम’च्या नाऱ्यांनी दुमदुमले

CD

बदलापूर, ता. २४ (बातमीदार) : प्रगतिशील बौद्ध समाज, बदलापूर शहर व ग्रामीण यांच्या वतीने नगरसेवक प्रवीण राऊत यांच्या पुढाकाराने भीम महोत्सव यंदाही उत्साहात आणि जल्लोषात पार पडला. घोरपडे मैदानावर शनिवारी (ता. २१) झालेल्या या महोत्सवाला बदलापूरकरांनी विक्रमी उपस्थिती लावली. ‘जागर महापुरुषांचा, जल्लोष भीम गीतांचा’ या संकल्पनेखाली झालेल्या कार्यक्रमासाठी मैदानासह परिसर हजारोंच्या गर्दीने फुलून गेला होता.

कार्यक्रमाची सुरुवात भंतेजींच्या हस्ते भीम–बुद्ध वंदनेने झाली. त्यानंतर प्रबोधनकार नितेश कराळे यांच्या विचारप्रवर्तक भाषणाने उपस्थितांना सामाजिक जाणीव आणि संविधानिक मूल्यांची आठवण करून दिली. यानंतर महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध गायक आनंद शिंदे, समर्थक शिंदे, कडूबाई खरात, मंजुषा शिंदे, राखी चौरे आणि प्रबुद्ध जाधव यांच्या दमदार भीम गीतांनी संपूर्ण मैदान दणाणून सोडले. डॉ. बाबासाहेब आंबेडकर, गौतम बुद्ध आणि छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जीवनगौरवावर आधारित गीतांनी उपस्थितांना भारावून टाकले. सायंकाळी सहा वाजता सुरू झालेला कार्यक्रम मध्यरात्रीपर्यंत रंगला; मात्र शेवटपर्यंत गर्दी तशीच कायम राहिली, हे विशेष उल्लेखनीय ठरले.
या वेळी नगराध्यक्षा रुचिता घोरपडे, उपनगराध्यक्षा प्रियंका दामले, भाजपचे नगरसेवक राजेंद्र घोरपडे यांच्यासह विविध पक्षांचे पदाधिकारी, रिपब्लिकन चळवळीतील ज्येष्ठ नेते व सामाजिक कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

चुकी नसताना माफी नाही : दिव्य शिंदे
महोत्सवाचे प्रमुख आकर्षण ठरल्या ‘सरकार युवा सेना’ अध्यक्षा आणि बिग बॉस फेम दिव्या शिंदे. त्यांनी आपल्या भाषणात ठाम भूमिका मांडताना, मी कोणतीही चूक केलेली नाही. संविधानानुसार मी चुकीची नसताना कोणाचीही माफी मागणार नाही, असे स्पष्टपणे सांगितले.

प्रवीण राऊत महापौर होणार?
भाजपचे स्थानिक नेते तथा नगरसेवक राजेंद्र घोरपडे यांनी केलेल्या घोषणेने कार्यक्रमात राजकीय रंग भरला. भविष्यात कुळगाव–बदलापूर महापालिका स्थापन होऊन अनुसूचित जातीचे आरक्षण लागू झाल्यास महापौर पदासाठी प्रवीण राऊत यांची निवड केली जाईल, अशी घोषणा करण्यात आली. हा निर्णय आमदार किसन कथोरे यांच्या उपस्थितीत घेण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.

 बाबासाहेबांचा ५५ फूट उंच पुतळा उभारणार
नगराध्यक्षा रुचिता घोरपडे यांनी येत्या १४ एप्रिल रोजी, डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त सोनिवली येथील स्मारक परिसरात ५५ फूट उंच पूर्णाकृती पुतळा उभारण्यात येणार असल्याची माहिती दिली. आज बाबासाहेबांमुळेच मी नगराध्यक्षा होऊ शकले, असे भावनिक उद्गार त्यांनी काढले.


बदलापूर : भीम महोत्सवाला घोरपडे मैदान हजारोंच्या गर्दीने फुलून गेला.
बदलापूर : सुप्रसिद्ध गायक आनंद शिंदे यांनी दमदार भीम गीत सादर केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Char Dham Yatra 2026 : चारधाम यात्रेदरम्यान मोबाईवर बंदी, पूजा-अर्चा, विधीचे शुल्कही वाढले, जाणून घ्या नवे नियम

MI vs PBKS Live: रोहित शर्माची माघार! मुंबई इंडियन्सच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये दोन बदल, सलामीला कोणती जोडी?

Ganesh Naik : वाघ-बिबट्यांच्या शिकारीमागे आंतरराष्ट्रीय जाळे; वनमंत्री गणेश नाईक यांचा गौप्यस्फोट

RTE Admission Issue : वसईत आरटीई प्रवेशावरून गोंधळ; टोकन न मिळाल्याने पालकांमध्ये संताप, भर उन्हात पालकांच्या लांबचलांब रांगा

Latest Marathi News Live Update : टीसीएस प्रकरणात आरोपींना तीन दिवसांची पोलीस कोठडी

SCROLL FOR NEXT