मुंबई

पालिका अर्थसंकल्पात कोटी कोटी उड्डाणे

CD

पालिका अर्थसंकल्पात कोटी कोटी उड्डाणे
प्रकल्प, भांडवली खर्च वाढणार; अर्थसंकल्प १० टक्क्यांनी वाढण्याची शक्यता

सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. २२ : पालिकेच्या रस्ते, आरोग्य, मोठे पायाभूत सुविधा प्रकल्प यांवरील तसेच भांडवली आणि महसुली खर्चातही वाढ होण्याची शक्यता आहे. त्यामुळे पालिकेच्या अर्थसंकल्पात १० टक्के वाढ होण्याची शक्यता आहे. गेल्या काही वर्षांत पालिकेच्या अर्थसंकल्पाची कोटींची उड्डाणे सुरू असून, अर्थसंकल्प ८० हजार कोटींपेक्षा अधिक होण्याची शक्यता आहे.

मुंबई महापालिकेत प्रशासक राजवटीत मार्च २०२२पासून आतापर्यंत पालिका आयुक्त अर्थसंकल्प सादर करीत होते. २०२३-२४, २०२४-२५ या वर्षांचा अर्थसंकल्प प्रशासक म्हणून आयुक्तांनी सादर केला होता. २०२५-२६चा ७४,४२७.४१ कोटींचा अर्थसंकल्प प्रशासक म्हणून भूषण गगराणी यांनी सादर केला होता. हा अर्थसंकल्प १४.१९ टक्के वाढीव होता. यंदाही अर्थसंकल्पात १० टक्के वाढ हाेण्याची शक्यता आहे.

आरोग्य, शिक्षण, विविध प्रकल्पांसह मुंबईचे सौंदर्यीकरण, प्रदूषण रोखण्यासाठी योजना, भूमिगत मार्केट, कोळीवाड्याचा विकास, गोरेगाव-मुलुंड लिंक रोड, समुद्राचे खारे पाणी गोडे, कोस्टल रोड, वर्सोवा-दहिसर, दहिसर-भाईंदर उन्नत मार्ग, खड्डेमुक्त रस्ते, सक्षम आरोग्य यंत्रणा, पूरमुक्त मुंबई अशा विविध प्रकल्पांसाठी अर्थसंकल्पात भरीव तरतूद करण्यात येणार आहे. या प्रकल्पांसाठी भांडवली खर्चात भरमसाट वाढ होण्याची शक्यता आहे. त्यामुळे यंदाचा अर्थसंकल्प वाढण्याची शक्यता आहे.

मुदत ठेवीतून खर्च
पालिकेच्या मुदत ठेवीतून रक्कम उचलून प्रकल्प मार्गी लावले जात असल्याचे समजते. त्यामुळे भांडवली खर्च वाढत चालला असल्याचे समजते. त्यामुळे यंदाच्या अर्थसंकल्पात वाढ होण्याची शक्यता आहे.

अर्थसंकल्पाला उशीर
अर्थसंकल्प सादर होण्यास यंदा निवडणुकीमुळे उशीर झाला आहे. दर पाच वर्षांनी आचारसंहितेच्या कारणामुळे अर्थसंकल्प सादर करण्यास काही दिवस पुढे ढकलण्याची तरतूद पालिकेच्या अधिनियमात असल्याचे पालिकेच्या सूत्रांनी सांगितले.
-----------
२५ फेब्रुवारीला अर्थसंकल्प
मुंबई महापालिकेचा २०२६-२७ या वर्षाचा अर्थसंकल्प पालिका आयुक्त भूषण गगराणी हे स्थायी समिती अध्यक्ष प्रभाकर शिंदे यांना २५ फेब्रुवारीला सादर करणार आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Eknath Shinde: एकनाथ शिंदेंनी त्यांची खाती इतर मंत्र्यांकडे सोपवली; मोठं कारण आलं समोर, पडद्यामागे नेमकं काय घडलं?

T20 WC, WI vs ZIM: ७ चौकार, ७ षटकार... वानखेडेवर हेटमायरचं वादळ; झिम्बाब्वेच्या गोलंदाजांना झोडपत विंडीजसाठी रचला वर्ल्डरेकॉर्ड

IND vs SA: अरे बॉल दे ना... ! अहमदाबादमध्ये द. आफ्रिकेचा खेळाडू चाहत्यांवर भडकला; Video Viral

बेकायदा इमारत होणार भुईसपाट! उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर प्रशासनाचा पवित्रा; नेमकं प्रकरण काय?

Latest Marathi News Live Update : सोलापूरात अवकाळी पावासाची जोरदार हजेरी

SCROLL FOR NEXT