मुंबई

डाॅ. पालवे आत्महत्या; अनंत गर्जेला जामीन

CD

डाॅ. पालवे आत्महत्या;
अनंत गर्जेला जामीन
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. २३ : पत्नीला आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा आरोप असलेला भाजप नेत्या पंकजा मुंडेंचा स्वीय सहाय्यक (पीए) अनंत गर्जे याला सोमवारी (ता. २३) सत्र न्यायालयाने जामीन मंजूर केला. जामिनाच्या आदेशाची सविस्तर प्रत रात्री उशिरापर्यंत उपलब्ध झाली नव्हती. 
गर्जेची पत्नी डॉ. गौरी पालवे (२८) या महापालिकेच्या केईएम रुग्णालयात दंतवैद्य म्हणून कार्यरत होत्या. त्यांनी गेल्या वर्षी २२ नोव्हेंबरला मध्य मुंबईतील वरळीतील राहत्या घरी आत्महत्या केली होती. गौरी आणि गर्जेचे गेल्या वर्षी फेब्रुवारीत लग्न झाले होते. गौरीच्या मृत्यूनंतर त्यांच्या वडिलांनी केलेल्या तक्रारीवरून वरळी पोलिसांनी गर्जे, त्याचा भाऊ आणि बहीण यांच्याविरुद्ध आत्महत्येस प्रवृत्त केल्याच्या आरोपाप्रकरणी गुन्हा दाखल केला होता.  आपल्यावरील आरोप अस्पष्ट असून कारवाई दुर्दैवी घटनेनंतरच्या भावनिक तणावाचा परिणाम असल्याचा दावा गर्जेने जामिनाची मागणी करताना केला होता.

गर्जेची बहीण शीतल गर्जे-आंधळे आणि भाऊ अजय गर्जेंना कनिष्ठ न्यायालयाने याआधीच अटकपूर्व जामीन मंजूर केला आहे. त्या पार्श्वभूमीवर गर्जेने जामिनासाठी सत्र न्यायालयात अर्ज केला होता. अतिरिक्त सत्र न्यायाधीश रूपाली पवार यांनी गर्जेला जामीन मंजूर केला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ashok Kharat: अशोक खरातच्या अत्यंत जवळच्या माणसाचा अपघाती मृत्यू; शिर्डी जमीन घोटाळ्यात होते साक्षीदार

Fake Alphonso Mango in Nipani : हापूसच्या पेटीत कर्नाटकी आंबा! बाजारात ग्राहकांची मोठी फसवणूक; 700 ते 800 रुपये दराने मिळतोय आंबा

Latest Marathi News Live Update: यवतमाळमध्ये कडक उन्हामुळे शेतातील डिस्ट्रिब्युशन बॉक्सने घेतला पेट

Pune Sugar Protest: शेतकऱ्यांचा एल्गार!घामाच्या पैशासाठी 'आरपार'ची लढाई; ३० एप्रिलपासून पुण्यातील साखर संकुलाला बेमुदत वेढा..

Success Story: ग्रामीण भागातून न्यायालयापर्यंतचा प्रवास; कल्पेश कड न्यायाधीशपदी विराजमान, जिद्द आणि मेहनतीचा विजय!

SCROLL FOR NEXT