अंतर्गत वादातून गोळीबार; एक जण गंभीर
बोईसर, ता. २३ (वार्ताहर) : पालघर जिल्ह्यातील बोईसर परिसरात अंतर्गत वादातून झालेल्या गोळीबारात एक जण गंभीर जखमी झाल्याची घटना सोमवारी (ता. २३) पहाटे उघडकीस आली. या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे. याप्रकरणी फॉरेन्सिक पथकाकडून पंचनामा करून पिस्तूल व अन्य पुरावे जप्त करण्यात आले आहेत. फरार आरोपीच्या शोधासाठी विशेष पथके रवाना करण्यात आली असून, अधिक तपास सुरू आहे.
महागाव-वाळवे येथील गोवरपाडा स्टॉप येथील सुरेश राजा वरखंडे (५२) हे या घटनेत गंभीर जखमी झाले आहेत. त्यांना सुरुवातीला बेटेगाव येथील रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले; मात्र प्रकृती चिंताजनक असल्याने पुढील उपचारासाठी वापी येथील रुग्णालयात हलविण्यात आले आहे.
प्राथमिक माहितीनुसार, बेटेगाव येथील चिकन भुजिंग सेंटरचे मालक उमेश घरत यांनी वैयक्तिक वादातून हा गोळीबार केल्याचा संशय आहे. जखमी सुरेश वरखंडे यांचा मुलगा आणि संबंधित युवती यांचे दोन वर्षांपासून प्रेमसंबंध होते. त्यांनी १५ फेब्रुवारीला मुरबे येथील मंदिरात विवाह केल्याच्या रागातून सोमवारी (ता. २३) पहाटे दोन ते तीन वाजण्याच्या सुमारास आरोपीने महागाव येथील घरात घुसून गोळीबार केल्याची माहिती पोलिसांनी दिली. या गोळीबारात सुरेश वरखंडे यांच्या डोक्याच्या मागील बाजूस गोळी लागून ते गंभीर जखमी झाले. घटनेनंतर आरोपी फरार झाला असून, पोलिस त्याचा शोध घेत आहेत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.