मुंबई

५० पेक्षा अधिक जलस्रोतांची स्वच्छता

CD

५० हून अधिक जलस्रोतांचे पुनरुज्जीवन
ठाणे, कल्याण-डोंबिवलीसह विविध ठिकाणी स्वच्छता मोहीम

कल्याण, ता. २४ (वार्ताहर) : संत निरंकारी मिशनतर्फे ‘स्वच्छ जल, स्वच्छ मन’ या अभियानाचा चौथा टप्पा रविवारी (ता. २२) देशभर उत्साहात राबवण्यात आला. सतगुरू माता सुदीक्षाजी महाराज आणि निरंकारी राजपिता रमितजी यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडलेल्या या महाअभियानात देशातील ९३० शहरांमधील १,६०० हून अधिक ठिकाणी जलस्रोतांची स्वच्छता करण्यात आली.

या मोहिमेअंतर्गत ठाणे जिल्हा आणि आसपासच्या परिसरातील अनेक महत्त्वाच्या तलावांची व नद्यांची सफाई करण्यात आली. डोंबिवली-कल्याणमधील खाडीकिनारा, गोग्रासवाडी (गणपती तलाव), गौरीपाडा तलाव, आदिवली तलाव, नवापाडा-ठाकुर्ली गणेश घाट, ठाणे-मुंब्रामधील ब्रह्माळा तलाव, तुर्फेपाडा तलाव (ब्रह्मांड), खिडकाळेश्वर महादेव मंदिर परिसर तसेच टिटवाळा (महागणपती तलाव), उल्हासनगर (खदाण तलाव), भिवंडी (वारली देवी तलाव), शहापूर (गंगा देवस्थान), कसारा सरोवर आणि काळू नदीकिनारा येथे मोहीम राबविण्यात आली.

प्रशासनाचे सहकार्य
या मोहिमेत ठाणे, कल्याण-डोंबिवली, उल्हासनगर महापालिका आणि बदलापूर नगरपालिकेच्या स्वच्छता विभागाने मोलाचे सहकार्य केले. मुंबई, नवी मुंबई आणि वसई-विरारमधील चौपाट्या आणि जेट्टींचीही या वेळी स्वच्छता करण्यात आली.

भक्ती आचरणात दिसली पाहिजे
दिल्ली येथे आयोजित विशेष सत्संगात माता सुदीक्षाजी महाराज यांनी मोलाचा संदेश दिला. बाबा हरदेव सिंहजी महाराज यांची शिकवण केवळ स्मरणात न ठेवता ती कृतीत आणणे हीच त्यांना खरी श्रद्धांजली आहे. सेवा, करुणा आणि समदृष्टी ही मूल्ये आपल्या दैनंदिन जीवनाचा भाग व्हायला हवीत. भक्ती केवळ बोलण्यापुरती मर्यादित न राहता ती आचरणात दिसली पाहिजे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Lawrence Bishnoi gang threat : खळबळजनक! महाराष्ट्रातील काँग्रेस आमदाराला लॉरेन्स बिश्नोई गँगकडून जीवे मारण्याची धमकी

गौतम गंभीरनं भारतीय क्रिकेटचं वाटोळं केलं, त्याने संघात राजकारण आणले...! खळबळजनक दाव्याने सारे चक्रावले

Panvel: पनवेलकरांसाठी मोठा निर्णय! सिडको वसाहत आणि २९ गावांना जोडणारी महापालिकेची बससेवा सुरू होणार; बसमार्ग आणि थांबे कसे ठरणार?

Latest Marathi News Live Update : जळगाव जिल्ह्यात हरभरा काढणीला वेग, उत्पन्नातही मोठी वाढ; बळीराजा सुखावला

Raksha Khadse : "आमदारांच्या मुलींच्या हस्ते उद्घाटनं उरकताय का?" रक्षा खडसेंनी 'महावितरण'ला झापले

SCROLL FOR NEXT