मुंबई

वसईकरांचा मुंबई प्रवास निर्विघ्न

CD

वसईकरांचा मुंबई प्रवास निर्विघ्न
नायगाव खाडीवर दुमजली पुलाला हिरवा कंदील
विरार, ता. २४ (बातमीदार)ः नायगाव ते भाईंदर यादरम्यानच्या नायगाव खाडीवर दुमजली पूल बांधण्याचा निर्णय एमएमआरडीएने घेतला आहे. या पुलाच्या वरच्या बाजूने मेट्रो, तर खालच्या बाजूने वाहनांसाठी मार्गिका असणार आहे. त्यामुळे वसईकरांचा मुंबई प्रवास निर्विघ्न होणार आहे.
मुंबई-अहमदाबाद महामार्गावरील वाहतूक कोंडीने एकीकडे वसईकर त्रस्त आहेत, तर दुसरीकडे लोकलच्या प्रचंड गर्दीचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे एमएमआरडीएने नायगाव खाडीवर दुमजली खाडीपूल बांधण्याचा निर्णय घेतला आहे. या पुलाच्या वरील बाजूवरून मेट्रो, तर खालून वाहने धावण्यासाठी मार्गिका उभारण्यात येणार आहे. त्यासाठी एमएमआरडीएने मेट्रो १३ मार्गिकेांची आखणी केली आहे. यासाठी दिल्ली मेट्रो रेल कॉर्पोरेशनच्या (डीएमआरसी) माध्यमातून आराखडा तयार केला असून, दुमजली पूल बांधणे व्यवहार्य ठरल्याने नायगाव खाडीपूल बांधण्याचा निर्णय घेतला आहे.
------------------------------------
आराखड्यास मान्यता
दुमजली खाडीपुलाच्या प्रस्तावाला एमएमआरडीएच्या बैठकीत मान्यता देण्यात आली आहे. त्यानंतर प्रस्तावाला राज्य मंत्रिमंडळाची मान्यता घेतली जाणार आहे. त्यानंतर प्रकल्प मार्गी लावण्यासाठी प्रक्रिया सुरू केली जाईल. दहिसर ते मिरा-भाईंदर मेट्रो ९ मार्गिकेचा विस्तार मेट्रो १३ मार्गिकेच्या माध्यमातून केला जात आहे. या मार्गिकेच्या सुधारित संरेखन, आराखड्यास मान्यता देण्यात आली.
=============================
खाडीपुलाची वैशिष्ट्ये
लांबी - ४.९८ किलोमीटर
रुंदी - २८.६० मीटर
मार्गिका - सहापदरी
खर्च- १,६०० कोटी
===============================
२०१५ मध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या काळात ९७५ कोटींचा निधी मंजूर झालेला असताना पुलाचे काम सुरू झाले नाही, पण दिरंगाईमुळे पुलाचा खर्च वाढला. या पुलाबरोबरच मेट्रोचा वसई-विरारपर्यंत विकास करावा, अशी मागणी वसईचे आमदार हितेंद्र ठाकूर यांनी २०२१ मध्ये एमएमआरडीएच्या आयुक्तांकडे केली होती. त्या मागणीला अखेर यश आले आहे.
- नारायण मानकर, माजी महापौर

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

पगार वाढल्याशिवाय कामावर नाही येणार, कामगार ठाम; जाळपोळ आणि तोडफोड सुरूच, ७ FIR, ३०० जण ताब्यात

Kolhapur Danoli Crime : कोल्हापुरातील दानोळीमध्ये अपहरण करून खून, २५ लाखांची मागणी, भरतेशचा कारण नसताना बळी, घटनास्थळी आमदार यड्रावकर दाखल

Pune Crime: हवेली तालुक्यात जमिनीच्या वादातून शेतकऱ्यावर जीवघेणा हल्ला; परस्पर विरोधात फिर्याद, ८ जणांविरुद्ध गुन्हा!

Latest Marathi News Update: नेस्कमधील कॉन्सर्टचा आणखी एक व्हिडिओ समोर, अनेकांनी ड्रिंक अँड ड्राईव्ह केल्याचा ही अंदाज

Pune Solapur flight: पुण्याहून सोलापूर आता ४० मिनिटांत पोहोचणे शक्य होणार; १ मेपासून स्टार एअरची विमानसेवा, नवीन स्लॉट मंजूर!

SCROLL FOR NEXT