मुंबई

कल्याणकारी योजनांसाठी पत्रप्रपंच

CD

कल्याणकारी योजनांसाठी पत्रप्रपंच
३१ मार्चपर्यंत मुदतवाढ देण्याची पालिकेकडे मागणी
विरार, ता. २५ (बातमीदार) ः वसई-विरार शहर पालिकेच्या महिला व बालकल्याण विभागाच्या विविध कल्याणकारी योजनांचे अर्ज भरण्यासाठी ३१ मार्चपर्यंत मुदतवाढ देण्यात यावी, अशी मागणी रुग्णमित्र राजेंद्र ढगे यांनी पालिका आयुक्तांकडे केली आहे.
महापालिकेद्वारे विद्यावर्धिनी शैक्षणिक योजना, आधारमाया योजना, जीवनदायिनी योजना (डायलिसिस उपचार), कर्करोग उपचार सहाय्य, वरदायिनी (विवाह अनुदान), दत्तक योजना अशा अनेक महत्त्वपूर्ण योजना राबवल्या जातात. अशा योजनांसाठी अर्ज करण्याची मुदत शनिवार (ता. २८)पर्यंत आहे; मात्र अनेक गरजू लाभार्थी तांत्रिक कारणांमुळे किंवा माहितीअभावी अद्याप अर्ज करू शकलेले नाहीत. ही बाब लक्षात घेऊन ही मुदत ३१ मार्चपर्यंत वाढवावी, जेणेकरून जास्तीत जास्त गरिबांना लाभ घेता येईल, असे ढगे यांनी पत्रात नमूद केले आहे. तसेच मुंबई पालिकेप्रमाणे वसई-विरारमध्येही समाजविकास अधिकाऱ्यांच्या माध्यमातून प्रत्येक प्रभागात मार्गदर्शन शिबिरे, शासकीय योजनांचा मेळावा घेण्याची मागणी केली आहे. =======================================
अनेक विधवा, निराधार महिला, अनाथ मुले, व्याधीग्रस्त रुग्ण महापालिकेच्या योजनांपासून वंचित राहू नयेत, हाच आमचा उद्देश आहे. प्रशासनाने सकारात्मक पाऊल उचलल्यास या कार्यात पूर्ण सहकार्य करण्यास तयार आहोत.
- राजेंद्र ढगे, रुग्णमित्र, वसई

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bride shot at wedding ceremony Video : विवाहमंडपात थरार! नववधूवर माथेफिरू प्रियकरानं सर्वांसमोरच झाडली गोळी

Udgir Gutkha Seized : पाठलाग करून साडेदहा लाखांचा गुटखा पकडला; एक चारचाकी तर एक आरोपी ताब्यात

SL vs NZ, T20 WC: न्यूझीलंडची उपांत्य फेरीच्या दिशेने वाटचाल! श्रीलंकेचे आव्हान संपुष्टात, जाता जाता पाकिस्तानची लावली वाट

Yermala News : कलाकेंद्र चालकाचा नियमांचा भंग; महाकाली कला केंद्राबाबत जिल्हाधिकारी यांचा मोठा निर्णय

Mumbai: चालत्या ट्रेनमधून केसांना धरत तरुणीला बाहेर ओढलं नंतर...; महिलेचं धक्कादायक कृत्य, मुंबई लोकलमधील राड्याचा व्हिडिओ समोर

SCROLL FOR NEXT