मुंबई

स्थलांतरित मजुरांना घरांची ओढ

CD

स्थलांतरित मजुरांना घराची ओढ
होळीच्या निमित्ताने गावाकडे मार्गस्थ
कासा, ता. २५ (बातमीदार) ः डहाणू परिसरातील आदिवासी कुटुंबे वर्षभर रोजगाराच्या शोधात स्थलांतर करतात; मात्र होळीची चाहूल लागताच ही कुटुंबे मूळ गावाकडे परतत असल्याने गाव-पाड्यांमध्ये उत्साहाचे वातावरण संचारले आहे.
मुंबई, ठाणे, नाशिक तसेच गुजरात राज्यातील कारखाने, वीटभट्टी, फळबागा, बांधकाम क्षेत्रात रोजगारासाठी प्रामुख्याने कामासाठी जातात. डहाणू तालुक्यात रोजगार हमी योजनेंतर्गत काही कामे उपलब्ध असली, तरी वेळेवर मजुरी मिळत नसल्याकारणामुळे अनेक कुटुंबे स्थलांतराचा मार्ग स्वीकारतात. पावसाळ्यातील चार महिने गावी राहिल्यानंतर दिवाळी संपताच मजूर पुन्हा शहरांकडे जातात; मात्र होळी, दिवाळी सणाच्या काळात आवर्जून गावी परततात. दरवर्षीप्रमाणे यंदाही होळीपूर्वी डहाणू तालुक्यातील गावांमध्ये स्थलांतरित मजुरांची वर्दळ वाढली आहे. त्यांच्या परतीमुळे गावागावांत सणाचा उत्साह संचारला असून ओस पडलेली गावे पुन्हा गजबजू लागल्याने उत्साहाचे वातावरण दिसत आहे.
------------------------------------
आगाऊ रकमेतून सण साजरा
होळी अर्थात शिमगा ग्रामीण भागात विशेष महत्त्वाचा सण मानला जातो. होळीच्या चार-आठ दिवसांच्या कालावधीत मजूर नातेवाइकांसोबत सण साजरा करतात. घरांची डागडुजी करून पुन्हा शहरांकडे रवाना होतात. सण साजरा करता यावा, यासाठी मालकांकडून आगाऊ रक्कमही घेतली जाते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bride shot at wedding ceremony Video : विवाहमंडपात थरार! नववधूवर माथेफिरू प्रियकरानं सर्वांसमोरच झाडली गोळी

Udgir Gutkha Seized : पाठलाग करून साडेदहा लाखांचा गुटखा पकडला; एक चारचाकी तर एक आरोपी ताब्यात

SL vs NZ, T20 WC: न्यूझीलंडची उपांत्य फेरीच्या दिशेने वाटचाल! श्रीलंकेचे आव्हान संपुष्टात, जाता जाता पाकिस्तानची लावली वाट

Yermala News : कलाकेंद्र चालकाचा नियमांचा भंग; महाकाली कला केंद्राबाबत जिल्हाधिकारी यांचा मोठा निर्णय

Mumbai: चालत्या ट्रेनमधून केसांना धरत तरुणीला बाहेर ओढलं नंतर...; महिलेचं धक्कादायक कृत्य, मुंबई लोकलमधील राड्याचा व्हिडिओ समोर

SCROLL FOR NEXT