मुंबई

भिवंडीत मालकावर बालमजुरीचा गुन्हा दाखल

CD

भिवंडी, ता. २३ (बातमीदार) : भिवंडीतील निजामपुरा पोलिस ठाणे परिसरातील एका वडा पाव दुकानात १२ वर्षांच्या अल्पवयीन मुलाला धोकादायक परिस्थितीत काम करण्यास भाग पाडल्याची घटना समोर आली आहे. पोलिसांनी कारवाई करीत दुकान मालकाविरुद्ध बालमजुरीचा गुन्हा दाखल केला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, २१ फेब्रुवारीला रात्री ८ वाजता मिठपाडा रोडवरील आदित्य हॉटेलजवळील वडापाव दुकानात तपासणी करण्यात आली. यादरम्यान निजामपुरा पोलिस ठाण्याच्या पोलिसांना एक अल्पवयीन मुलगा काम करताना आढळला. तो मुलगा गॅस स्टोव्हजवळ गरम तव्यावर बटाटेवडे तळत होता. चौकशी केल्यानंतर मुलाने स्वतःची ओळख जावेद (काल्पनिक नाव) असून, त्याचे वय १२ वर्षे असल्याचे सांगितले. दोन महिन्यांपासून तो दुकानात काम करत होता आणि त्याला दररोज अंदाजे २५० रुपये मिळत होते. दुकानमालक रियाज अब्दुल रौफ सिद्दीकी (२२) याने अल्पवयीन मुलाला कामावर ठेवले. तसेच त्याला गरम तेल आणि गॅस चुलीजवळ काम करायला लावल्याने जीवाला आणि सुरक्षिततेला गंभीर धोका निर्माण झाला होता. निजामपुरा पोलिसांनी बालकामगार (बालकाम प्रतिबंधक) कायदा आणि बाल न्याय कायद्याच्या संबंधित कलमांखाली मालकाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणी तपास सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2026 POINT TABLE: चुका करूनही चेन्नई सुपर किंग्स जिंकले! कोलकाता नाइट रायडर्सची विजयाची पाटी कोरीच, मुंबई इंडियन्सला धक्का...

Startup Success : दोनदा नोकरीवरून काढलं… त्यानंतर त्याने असं काही केलं की महिन्याला कमावतो १.३ कोटी

Dhurandhar 2 Movie : धुरंधर चित्रपट शृंखलेचा नवा विक्रम; ३००० कोटींची कमाई करणारी पहिली भारतीय फिल्म सिरीज

IPL चे सामने ऑस्ट्रेलियात अन् BBL ची मॅच चेन्नईत! क्रिकेट चाहत्यांसाठी खूप मोठी बातमी; पडद्यामागे बऱ्याच हालचाली, BCCI...

Babasaheb Ambedkar Jayanti : भीमसागर नतमस्तक! अभिवादनासाठी हजारो अनुयायांची गर्दी

SCROLL FOR NEXT