मुंबई

अपघातप्रकरणी वाहनचालकाला अटक

CD

कल्याणमध्ये चालकाला ''स्टंटबाजी'' भोवली
४८ तासांत मुख्य आरोपी गजाआड; खडकपाडा पोलिसांची धडक कारवाई

डोंबिवली, ता. २४ : कल्याण पश्चिमेतील रिंगरोडवर भरधाव वेगाने कार चालवून दुचाकीला धडक देणाऱ्या आणि घटनास्थळावरून पळ काढणाऱ्या मुजोर चालकाला खडकपाडा पोलिसांनी अवघ्या ४८ तासांत बेड्या ठोकल्या आहेत. मनीष सतीश मनवानी (२३) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव असून, त्याच्यासह स्टंटबाजी करणाऱ्या इतर दोन कारचालकांवरही गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

१८ फेब्रुवारी रोजी रात्री ११ च्या सुमारास नवीन वडवली रोडवर हा भीषण अपघात घडला होता. आरोपी मनीष याने आपल्या भरधाव कारने (एमएच ०५ जीडी ११११) दुचाकीचालक विकास कुंभार यांना मागून जोरदार धडक दिली. या धडकेत कुंभार यांच्या डोक्याला व हाताला गंभीर दुखापत झाली. अपघात केल्यानंतर जखमीला कोणतीही मदत न करता आरोपी घटनास्थळावरून पसार झाला होता. सुरुवातीला कोणतेही पुरावे नसताना, पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेज, तांत्रिक विश्लेषण आणि प्रत्यक्षदर्शींच्या माहितीवरून तपास चक्र फिरवली. तपासात असे निष्पन्न झाले की तीन कारचालक रात्रीच्या वेळी रस्त्यावर रेसिंग आणि स्टंटबाजी करत होते. या बेफाम वेगामुळेच हा अपघात घडला. पोलिसांनी आरोपी मनीष मनवानी याला कारसह ताब्यात घेतले आहे.

इतर सहभागींवरही कारवाई
खडकपाडा पोलिसांनी केवळ मुख्य आरोपीलाच नाही, तर रेसिंगमध्ये सहभागी असलेल्या इतर दोन वाहनांच्या चालकांविरोधातही स्वतंत्र गुन्हे दाखल केले आहेत. ही कारवाई पोलिस उपायुक्त अतुल झेंडे, सहाय्यक पोलिस आयुक्त कल्याणजी घेटे आणि वरिष्ठ पोलिस निरीक्षक मारुती आंधळे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलिस निरीक्षक विजय गायकवाड, पोउनि भूषण देवरे आणि डी. बी. स्टाफने यशस्वीरीत्या पार पाडली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

8th Pay Commission: आठव्या वेतन आयोगाबाबत मोठी अपडेट! प्रत्येक लेव्हलचा फिटमेंट फॅक्टर असेल वेगळा; उद्या आयोगाची बैठक

PAK vs ENG, T20 WC: पाकिस्तानचा दुसरा सामनाही रद्द झाला तर? मुंबईतील उपांत्य फेरीचा सामना दुसरीकडे नाही खेळवावा लागणार; जाणून घ्या गणित

Dombivli Crime: नर्सने बोलणे बंद केले, रागात डॉक्टरने १० बिअर पिऊन ४५ झोपेच्या गोळ्या खाल्ल्या; त्यानंतर जे घडलं...

"माझं माझ्या बायकोवर प्रेम नाही" प्रसिद्ध अभिनेत्याचा धक्कादायक खुलासा ; "जबरदस्तीने लग्न.."

Latest Marathi News Live Update : बार्शी तालुक्यातील आगळगाव परिसराला वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाने झोडापलं

SCROLL FOR NEXT