मुंबई

गिरणी कामगार संयुक्त लढ्यात खटाव मिल कामगारांचा सहभाग

CD

गिरणी कामगार संयुक्त लढ्यात खटाव मिल कामगारांचा सहभाग
शिवडी, ता. २४ (बातमीदार) : गिरणी कामगार संयुक्त लढा समितीच्या आंदोलनाला मिळत असलेले यश आणि मुंबईसह ग्रामीण भागातील कामगारांचा वाढता पाठिंबा लक्षात घेता पाटण-कराड येथील खटाव मिलमधील गिरणी कामगार संघर्ष समितीने संयुक्त लढ्यात सहभागी होण्याचा निर्णय घेतला आहे.
खटाव मिल संघर्ष समितीचे प्रमुख कार्यकर्ते राजेंद्र साखरे, बाळकृष्ण धनवट आणि सुहास देसाई यांनी आपल्या सहकाऱ्यांसह या लढ्यात सक्रिय सहभागाची घोषणा केली. परळ पूर्व येथील राष्ट्रीय मिल मजदूर संघ येथे शनिवारी संध्याकाळी आयोजित स्वागत समारंभात या तिघांचे संघाचे सरचिटणीस गोविंदराव मोहिते यांनी शाल व पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. या वेळी खजिनदार निवृत्ती देसाई, मारुती शिंत्रे यांच्यासह अन्य पदाधिकारी उपस्थित होते.
तिन्ही नेत्यांनी आपल्या कार्यकर्त्यांसह राष्ट्रीय मिल मजदूर संघाचे सदस्यत्व स्वीकारले. या वेळी बोलताना राजेंद्र साखरे यांनी सांगितले की, गिरणी कामगारांच्या घरांच्या प्रश्नावर संयुक्त लढ्याचे प्रमुख सचिन अहिर आणि निमंत्रक गोविंदराव मोहिते यांनी ठाम भूमिका घेतली आहे. त्यामुळे पाटण-कराड परिसरातील कामगारांनी मोठ्या संख्येने या लढ्यात प्रत्यक्ष सहभागी होण्याचा एकमुखी निर्णय घेतला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gautam Adani: अंबानींना मागे टाकत गौतम अदानी झाले आशियातील नंबर 1 श्रीमंत! कारण काय? किती झाली संपत्ती

Best Jobs 2026 : कोटींचा पगार, मोफत घर-जेवण अन् 1 वर्षात गर्लफ्रेंड/बॉयफ्रेंड मिळणार! 'ही' कंपनी देत आहे अनोखी नोकरी

लग्नानंतर त्याचं ते सत्य समजलं... शुभांगी अत्रेचा मृत पतीबद्दल मोठा खुलासा, म्हणाली, 'आम्हाला वाटलेलं की तो...

Video : दीप आणि ज्योतीवर कोसळणार मोठं संकट ! मालिकेतील नव्या ट्विस्टसाठी प्रेक्षकही उत्सुक

ST Bus Maharashtra : एसटी बसस्थानकांबाबत मोठे निर्णय; १ जूनपासून स्वच्छतागृह मोफत, ८ हजार नव्या बस, ३० रुपयात नाष्टा, मंत्र्यांची घोषणा

SCROLL FOR NEXT