मुंबई

केळवेत मायबोलीचा जागर

CD

केळवेत मायबोलीचा जागर

पालघर, ता. २४ (बातमीदार) : आंतरराष्ट्रीय मायबोली दिनानिमित्त केळवेत मायबोलीचा जागर केला गेला. अनाम प्रेम या संस्थेच्या वतीने केळवे शितलादेवी मंदिराच्या सभागृहात रविवारी (ता. २२) जिल्ह्यातील स्थानिक बोलीभाषा संवर्धनाच्या दृष्टीने हा कार्यक्रम संस्थेने आयोजित केला होता.
पालघर आणि ठाणे जिल्ह्यातील कुपारी, वंजारी, वाडवळ, वारली, भंडारी, अहिराणी, खानदेशी, कुणबी, आदिवासी, आगरी, कातकरी अशा मायबोलीतून या वेळी संवाद साधत गाणी, कविता आणि साहित्याचे सादरीकरण करण्यात आले. या सादरीकरणात उपस्थितांना भाषा संस्कृती अनुभवायला मिळाली. या कार्यक्रमात लोप पावत चाललेले भोर नृत्य आदिवासी कलाकारांनी सादर केले, तर पालघरच्या कर्णबधिर शाळेतील विद्यार्थ्यांनी बिरसा मुंडा यांच्यावर आधारित लोककलेचे आदिवासी नृत्याचे सादरीकरण केले. या उपक्रमात भाषा संवर्धन आणि भाषेचे जतन यावर सखोल चर्चा झाली. गेल्या १९ वर्षांपासून अनाम प्रेम ही संस्था जागतिक मायबोली दिवस साजरा करत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ashok Kharat: अशोक खरातच्या अत्यंत जवळच्या माणसाचा अपघाती मृत्यू; शिर्डी जमीन घोटाळ्यात होते साक्षीदार

Fake Alphonso Mango in Nipani : हापूसच्या पेटीत कर्नाटकी आंबा! बाजारात ग्राहकांची मोठी फसवणूक; 700 ते 800 रुपये दराने मिळतोय आंबा

Latest Marathi News Live Update: अशोक खरातच्या ओकस कार्यालयात ईडीकडून गेल्या तीन तासांपासून झडती सुरू

Pune Sugar Protest: शेतकऱ्यांचा एल्गार!घामाच्या पैशासाठी 'आरपार'ची लढाई; ३० एप्रिलपासून पुण्यातील साखर संकुलाला बेमुदत वेढा..

Success Story: ग्रामीण भागातून न्यायालयापर्यंतचा प्रवास; कल्पेश कड न्यायाधीशपदी विराजमान, जिद्द आणि मेहनतीचा विजय!

SCROLL FOR NEXT