धारावीतील विद्यार्थ्यांसाठी मोफत अभ्यासिका
मनोहर जोशी महाविद्यालयाचा उपक्रम
धारावी, ता. २४ (बातमीदार) : धारावी परिसरात आजही अपेक्षित सामाजिक व शैक्षणिक वातावरणाचा अभाव जाणवतो. अरुंद गल्ल्या, लहान घरे आणि अभ्यासासाठी पुरक सुविधा नसल्यामुळे विद्यार्थ्यांना शांतपणे अभ्यास करण्यास अडचणी येतात. या पार्श्वभूमीवर मनोहर जोशी महाविद्यालय येथे दहावी, बारावी तसेच इतर स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी दिवसरात्र अभ्यासिकेची सोय उपलब्ध करून देण्यात आली आहे.
मागील १६ वर्षांपासून सुरू असलेल्या या उपक्रमाचा लाभ घेत धारावीतील अनेक विद्यार्थी डॉक्टर, अभियंता आणि वकील झाले असून, काही विद्यार्थी खासगी क्षेत्रात नामांकित पदांवर कार्यरत आहेत. प्रशस्त जागा व आवश्यक सुविधांनी सुसज्ज असलेली ही अभ्यासिका विद्यार्थ्यांसाठी एक सुवर्णसंधी असल्याचे महात्मा फुले एज्युकेशन ट्रस्ट चे विश्वस्त प्रमोद बाबुराव माने यांनी सांगितले.
सदर अभ्यासिका सर्वांसाठी मोफत असून, दररोज सायंकाळी ६ ते ९ या वेळेत विद्यार्थ्यांनी याचा लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे. परीक्षाकाळात विद्यार्थ्यांना शांत व अभ्यासपूरक वातावरण मिळावे आणि त्यांना अधिक मन लावून अभ्यास करता यावा, हा या उपक्रमामागील प्रमुख उद्देश असल्याचे माने यांनी स्पष्ट केले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.