मुंबई

१४ गावांतील प्रलंबित प्रश्नांवर उपमहापौर आक्रमक

CD

नवी मुंबई, ता. २४ (वार्ताहर) : १४ गाव क्षेत्रातील प्रलंबित मागण्यांची दखल घेत उपमहापौर दशरथ भगत यांनी महापालिका प्रशासनाला चांगलेच धारेवर धरले आहे. या भागातील विकासकामांच्या अनुषंगाने नगरसेविकांनी मांडलेल्या प्रश्नांची तातडीने पूर्तता करावी, अशा लेखी सूचना उपमहापौर भगत यांनी महापालिका आयुक्तांना पत्राद्वारे दिल्या आहेत. यामुळे १४ गाव क्षेत्रातील गेल्या अनेक वर्षांपासून रखडलेल्या जनहिताच्या कामांना आता गती मिळण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

१४ गाव क्षेत्रातील नगरसेविकांनी आपल्या प्रभागातील रस्ते, पाणी, मलनिस्सारण वाहिन्या आणि आरोग्य सुविधांबाबत सातत्याने पाठपुरावा केला होता, मात्र प्रशासकीय स्तरावर या मागण्यांकडे दुर्लक्ष होत असल्याची तक्रार लोकप्रतिनिधींकडून होत होती. या तक्रारींची दखल घेत उपमहापौर दशरथ भगत यांनी स्वत: या विषयात लक्ष घातले असून, थेट आयुक्तांनाच पत्र पाठवून जाब विचारला आहे. तसेच नगरसेविकांनी वारंवार केलेल्या मागणीकडे दुर्लक्ष करणाऱ्या संबंधित विभागाच्या कामकाजावर नाराजी व्यक्त केली.

१४ गाव परिसरातील मूलभूत सुविधांचे प्रश्न युद्धपातळीवर मार्गी लावण्याचे व जनहिताच्या मागण्या केवळ कागदावर न ठेवता, त्यांची प्रत्यक्ष अंमलबजावणी करून अहवाल सादर करण्याचे निर्देश दिले आहेत. या पत्राद्वारे उपमहापौरांनी स्पष्ट केले आहे की, लोकप्रतिनिधी जेव्हा जनतेच्या तक्रारी घेऊन येतात, तेव्हा त्यावर तातडीने निर्णय घेणे हे प्रशासनाचे कर्तव्य आहे. उपमहापौरांच्या या आक्रमक भूमिकेमुळे १४ गावांतील महिला नगरसेविकांनी समाधान व्यक्त केले असून, आता प्रशासन यावर किती वेगाने पावले उचलते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sindhudurg ZP : मार्च २०२६ची डेडलाईन जवळ; सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेच्या २५ कोटी निधीवर ‘काउंटडाउन’ सुरू!

PAK vs ENG, T20 WC: पाकिस्तानचा दुसरा सामनाही रद्द झाला तर? मुंबईतील उपांत्य फेरीचा सामना दुसरीकडे नाही खेळवावा लागणार; जाणून घ्या गणित

तिने ज्या हिमतीने परिस्थिती सांभाळली... विकी कौशलने केलं नवी आई कतरीनाचं कौतुक; म्हणतो- बाळासाठी...

Farmer Protest : कर्जमाफीत पळवाटा शोधू नका; शेतकरी संघटनेचा राज्य सरकारला 'न भूतो न भविष्यती' आंदोलनाचा इशारा

Latest Marathi News Live Update : अवकाळी पावसाचा लातूर जिल्ह्याला फटका,14 हजार 672 हेक्टर वरील रब्बी पिकांचे नुकसान

SCROLL FOR NEXT