शस्त्रधारी रिक्षाचालकासह एकाला अटकेत
विष्णूनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
डोंबिवली, ता. २४ : शहर वाहतूक उपविभागाच्या सतर्कतेमुळे गणेश चौक परिसरात एका संशयास्पद रिक्षाचालकाला आणि त्याच्या साथीदाराला धारदार शस्त्रांसह ताब्यात घेण्यात आले आहे. सोमवारी रात्री झालेल्या या कारवाईमुळे परिसरात खळबळ माजली असून, दोघांविरुद्ध विष्णूनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सोमवारी रात्री ८ वाजेच्या सुमारास डोंबिवली (पश्चिम) येथील गणेश चौक आणि महात्मा फुले रोड परिसरात वाहतूक पोलिस पेट्रोलिंग करत होते. यावेळी एक रिक्षाचालक अत्यंत निष्काळजीपणे वाहन चालवताना आढळला. संशय आल्याने पोलिसांनी रिक्षा थांबवून विचारपूस केली असता, चालक आणि त्याच्यासोबत असलेला प्रवासी यांच्या हालचाली संशयास्पद वाटल्या. वाहतूक पोलिसांनी तात्काळ विष्णूनगर पोलिसांना पाचारण केले. पोलिसांनी दोघांची झडती घेतली असता त्यांच्याकडे धारदार शस्त्रे मिळून आली. रिक्षाचालक दीपक वेलकर (वय २४) व त्याचा साथीदार प्रेम जाधव (२२) यांना पोलिसांना ताब्यात घेतले आहे. संशयास्पद हालचालींमुळे या दोघांची चौकशी केली असता त्यांच्याकडे शस्त्रे आढळली. याप्रकरणी पुढील कायदेशीर तपास सुरू आहे. अशी माहिती वाहतूक उपविभागाचे प्रभारी अधिकारी श्रीराम पाटील यांनी दिली.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.