खासदार शिंदेची ''पार्लमेंटरी फ्रेंडशिप ग्रुप''मध्ये नियुक्ती
इंडोनेशिया दौऱ्यात करणार भारतीय शिष्टमंडळाचे नेतृत्व
डोंबिवली, ता. २४ : कल्याण लोकसभा मतदारसंघाचे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्यावर पुन्हा एकदा जागतिक स्तरावर भारताची बाजू मांडण्याची महत्त्वपूर्ण जबाबदारी सोपवण्यात आली आहे. लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या ''पार्लमेंटरी फ्रेंडशिप ग्रुप'' अंतर्गत डॉ. शिंदे इंडोनेशिया दौऱ्यावर जाणाऱ्या भारतीय शिष्टमंडळाचे नेतृत्व करणार आहेत.
भारतीय संसदीय लोकशाही अधिक सक्षम करण्यासाठी ६० हून अधिक देशांशी संवाद साधण्याचा हा विशेष उपक्रम आहे. या दौऱ्यात व्यापार, तंत्रज्ञान, शिक्षण आणि सांस्कृतिक देवाणघेवाण यांसारख्या महत्त्वाच्या क्षेत्रांतील द्विपक्षीय सहकार्यावर भर दिला जाईल. ''संसद ते संसद'' आणि ''जनता ते जनता'' संवाद वाढवून पारंपारिक राजनैतिक संबंधांना संसदीय स्तरावर बळ देणे हा या दौऱ्याचा उद्देश आहे. डॉ. शिंदे यांनी यापूर्वीही अनेक देशांच्या शिष्टमंडळात सक्रिय सहभाग नोंदवत आपली छाप पाडली आहे. त्यांनी संयुक्त अरब अमिराती, सिएरा लिओन, लायबेरिया, डेमोक्रॅटिक रिपब्लिक ऑफ काँगो या देशांमध्ये भारताची भूमिका प्रभावीपणे मांडली आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.