मुंबई

महा निर्यात इग्नाईट कन्व्हेंशन कार्यशाळा उत्साहात

CD

रायगडच्या औद्योगिक विकासाला ‘महा निर्यात’ची गती
जिल्हा नियोजन भवन येथे कार्यशाळा उत्साहात
अलिबाग, ता. २४ (वार्ताहर) ः राज्याच्या औद्योगिक प्रगतीत मोलाचे योगदान देणाऱ्या एमएसएमई क्षेत्राची कार्यक्षमता वाढवण्यासाठी आणि ‘एक जिल्हा एक उत्पादन’ या उपक्रमाला गती देण्यासाठी जिल्हाधिकारी किशन जावळे यांच्या मार्गदर्शनाखाली महा निर्यात इग्नाईट कन्व्हेंशन २०२६ अंतर्गत जिल्हास्तरीय एकदिवसीय कार्यशाळा शुक्रवारी (ता. २०) उत्साहात पार पडली. या कार्यशाळेच्या माध्यमातून उद्योजकांना निर्यातवृद्धी आणि शासकीय योजनांची माहिती एकाच व्यासपीठावर उपलब्ध करून देण्यात आली.
या कार्यशाळेत मुख्य कार्यकारी अधिकारी नेहा भोसले, उद्योग सहसंचालक कोकण विभाग विजू शिरसाठ, उपसंचालक अश्विन घोलपकर, व्यवस्थापक लोहीत रिषी, सहाय्यक व्यवस्थापक पी. ए. बामणे, किशोर गिरोला, विपणन कार्यकारी अनिकेत कदम व आप्पासाहेब डोईफोडे, भारतीय डाक सल्लागार प्रणव झुंझारराव, जिल्हा उद्योग केंद्र प्रबंधक निशांत जाधव, आर्य लोटणकर आणि जिल्ह्यातील सर्व औद्योगिक संघटनेच्या अध्यक्षासह सुमारे २५० पेक्षा अधिक उद्योजक उपस्थित होते.
महा निर्यात इग्नाईट कन्व्हेंशन २०२६ कार्यशाळेस उपस्थित असलेल्या सर्व उद्योजकांसाठी डीजीएफटी, अपेडा, आयडीबीआय, ईओडीबी, भारतीय डाक, ईवाय, न्यू इंडिया इन्शुरन्स, मैत्री या विभागांचे सादरीकरण करण्यात आले. उद्योग सहसंचालक, कोकण विभाग, ठाणे यांनी महा निर्यात इग्नाईट कन्व्हेंशन २०२६ कार्यशाळेची प्रास्ताविक केले व उद्योग विभागातील निर्याताभिमूख योजनांची माहिती उपस्थित उद्योजकांना देण्यात आली. उद्योग निरीक्षक एम. एम. पालकर यांनी जिल्ह्यातील उद्योगांच्या विकासाकरिता जिल्हाधिकारी यांच्या सूक्ष्म नियोजन व सक्रिय सहभाग असल्याने उद्योगाचा विकास प्राधान्याने होत असल्याचे नमूद करून विकास आयुक्त (उद्योग) यांच्या मार्गदर्शनाने महा निर्यात इग्नाईट कन्व्हेंशन २०२६ कार्यशाळेचे आयोजन केल्याचे नमूद केले.

बांबू क्षेत्रातील निर्यातीवर विशेष भर
किशन जावळे यांनी उपस्थित उद्योजकांना निर्यात कशी करावी, कोणत्या स्वरूपात करावी याची माहिती दिली. रायगड जिल्ह्याच्या निर्यातीत जास्तीत जास्त वाढ होण्यासाठी उद्योजकांना मार्गदर्शन केले व रायगड जिल्ह्यात बांबू औद्योगिक समूह घटक प्रस्तावित असल्याने त्या क्षेत्रातील उद्योजकांना औद्योगिक समूहाचा लाभ होऊन बांबू क्षेत्रात निर्यातीत चालना मिळेल, असे सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींच्या खात्यात पैसे जमा होण्यास सुरुवात; २१०० रुपये कधीपासून मिळणार?

शेवटी त्यांचे सीन बसूनच व्हायचे... 'आई कुठे काय करते' करताना अशी झालेली कांचन आजींची अवस्था; मिलिंद गवळींचा खुलासा

Latest Marathi News Live Update : जळगाव जिल्ह्यात हरभरा काढणीला वेग, उत्पन्नातही मोठी वाढ; बळीराजा सुखावला

डॉक्टरांचे चुकीचे उपचार अन् शरीरभर इन्फेक्शन; थोडक्यात वाचली CID फेम मराठी अभिनेत्री "म्हणून मुलाला जन्म.."

Railway recruitment 2026 : रेल्वेमध्ये नोकरीची मोठी संधी!, ११ हजारांहून अधिक ‘असिस्टंट लोको पायलट’ पदांवर भरती

SCROLL FOR NEXT