खारघर, ता. २४ (बातमीदार) : तळोजा परिसरात सिडकोच्या जमीन वादाच्या पार्श्वभूमीवर बी. जी. शिर्के कंपनीच्या काही कामगारांकडून तिघा व्यक्तींवर लाकडी दांडका व लोखंडी सळईने हल्ला करण्यात आल्याची घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी पनवेल पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलिसांनी तीन संशयितांना ताब्यात घेतले आहे. पसार संशयितांचा शोध सुरू आहे.
तळोजा गावालगत पेंधर येथील ग्रामस्थ देविदास पाटील हे ९ फेब्रुवारीला तळोजा सेक्टर-३ मधील जमीन वादासंदर्भात सुनील कातारा आणि सचिन जाधव यांच्यासोबत चर्चा करत होते. या वेळी शिर्के कंपनीचा एक कामगार मोकळ्या जागेत शौचासाठी आला होता. संबंधित जागा खासगी असल्याचे सांगत पाटील यांनी त्या कामगारास तेथून जाण्यास सांगितले. यावरून संतप्त झालेल्या कामगाराने इतर साथीदारांना बोलावून घेतले. त्यानंतर त्यांनी एकत्र येऊन देविदास पाटील, सुनील कातारा आणि सचिन जाधव यांच्यावर लाकडी दांडका आणि लोखंडी सळईने हल्ला केला. या हल्ल्यात तिघेही गंभीर जखमी झाले असून, त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.