मुंबई

आयरेगाव टावरे पाड्यात तीव्र पाणीटंचाई

CD

डोंबिवलीत उन्हाळ्याआधीच पाणीबाणी
आयरेगाव परिसरात १५ लिटर पाण्यासाठी २०० रुपयांचा भुर्दंड

डोंबिवली, ता. २४ : डोंबिवली पूर्वेतील आयरेगाव, टावरे पाडा परिसरात भीषण पाणीटंचाई निर्माण झाली आहे. उन्हाळ्याची चाहूल लागताच पाणीपुरवठा विस्कळित झाल्याने रहिवाशांना पिण्याच्या पाण्यासाठी वणवण करावी लागत आहे. विशेष म्हणजे, अवघ्या १५ लिटर पाण्याच्या कॅनसाठी नागरिकांना २०० रुपये मोजावे लागत असल्याने रहिवाशांचे आर्थिक गणित पूर्णपणे कोलमडले आहे.

स्थानक परिसर जवळ असल्याने या भागात मोठ्या प्रमाणात नागरीकरण झाले आहे. मात्र, मूलभूत सुविधा असलेल्या पाण्याचाच पत्ता नसल्याने नागरिकांचे हाल होत आहेत. विकतच्या पाण्यावर दरमहा हजारो रुपये खर्च होत असल्याने मध्यमवर्गीय कुटुंबाचे बजेट बिघडले आहे. सध्या १० वीच्या परीक्षा सुरू आहेत. घरात पाणी नसल्याने पाणी भरण्याच्या धावपळीत पालकांना मुलांच्या अभ्यासाकडे लक्ष देणे कठीण होत आहे. त्यामुळे महापालिकेकडे पाणी नाही, मग विकायला येणारे पाणी नेमके येते कुठून, असा संतप्त सवाल रहिवासी विचारत आहेत. दोन वर्षांपूर्वी पाणीटंचाईमुळे खदाणीवर कपडे धुण्यासाठी गेलेल्या चार जणांचा बुडून मृत्यू झाला होता. या घटनेची आठवण करून देत, नागरिकांना पुन्हा अशा धोकादायक पर्यायांकडे वळावे लागू नये, यासाठी तातडीने उपाययोजना करण्याची मागणी होत आहे.

स्थानिक भाजप नगरसेवक मंदार टावरे यांनी या परिस्थितीवर स्पष्टीकरण दिले आहे. काही तांत्रिक अडचणींमुळे पाणीटंचाई निर्माण झाली आहे. परिसरात अंतर्गत जलवाहिनी टाकण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. हे काम पूर्ण होताच पाणीपुरवठा सुरळीत होईल. सध्या नागरिक सायकल, रिक्षा किंवा हाताने कॅन वाहून पाणी आणताना दिसत आहेत. प्रशासनाने टँकरद्वारे तरी मोफत पाणीपुरवठा करावा, अशी मागणी आता जोर धरू लागली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Lawrence Bishnoi gang threat : खळबळजनक! महाराष्ट्रातील काँग्रेस आमदाराला लॉरेन्स बिश्नोई गँगकडून जीवे मारण्याची धमकी

गौतम गंभीरनं भारतीय क्रिकेटचं वाटोळं केलं, त्याने संघात राजकारण आणले...! खळबळजनक दाव्याने सारे चक्रावले

Panvel: पनवेलकरांसाठी मोठा निर्णय! सिडको वसाहत आणि २९ गावांना जोडणारी महापालिकेची बससेवा सुरू होणार; बसमार्ग आणि थांबे कसे ठरणार?

Latest Marathi News Live Update : जळगाव जिल्ह्यात हरभरा काढणीला वेग, उत्पन्नातही मोठी वाढ; बळीराजा सुखावला

Raksha Khadse : "आमदारांच्या मुलींच्या हस्ते उद्घाटनं उरकताय का?" रक्षा खडसेंनी 'महावितरण'ला झापले

SCROLL FOR NEXT