मुंबई

वीरमाता जिजाऊ सेवा संस्थेचा भव्य शिवजन्मोत्सव उत्साहात

CD

वीरमाता जिजाऊ सेवा संस्थेचा भव्य शिवजन्मोत्सव उत्साहात
घाटकोपर, ता. २४ (बातमीदार) : घाटकोपर (प.) येथील भोसले चाळ, सर्वोदय हॉस्पिटलमागील भीमनगर परिसरात वीरमाता जिजाऊ सेवा संस्था यांच्या वतीने शिवजन्मोत्सव २०२६ मोठ्या उत्साहात आणि दिमाखात साजरा करण्यात आला. परिसर देशभक्तीपर घोषणांनी आणि शिवमय वातावरणाने दुमदुमून गेला होता.
यानिमित्ताने लहान मुलांसाठी आकर्षक वेशभूषा स्पर्धा तसेच पारंपरिक लेझीम सादरीकरणाचे आयोजन करण्यात आले. चिमुकल्यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जीवनातील विविध ऐतिहासिक प्रसंगांचे सादरीकरण करत उपस्थितांची मने जिंकली.
अमृतनगर ते भीमनगर यादरम्यान भव्य ‘शिवज्योत दौड’ काढण्यात आली. युवक-युवतींनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवत शिवभक्तीचा संदेश दिला. महिलांसाठी हळदी-कुंकू समारंभही आयोजित करण्यात आला होता. कार्यक्रमाचे विशेष आकर्षण म्हणजे चिमुकल्यांच्या माध्यमातून सादर करण्यात आलेले शिवव्याख्यान. आर्या शिंदे, गार्गी भोसले, काव्या भोसले, सौम्या भोसले, आराध्या शिंदे, प्रियांश शिंदे, शौर्य शिंदे आणि संचिता भोसले या विद्यार्थ्यांनी प्रभावी वक्तृत्वातून शिवचरित्राचा गौरवपूर्ण आढावा घेतला. त्यांच्या आत्मविश्वासपूर्ण सादरीकरणाला उपस्थितांनी टाळ्यांच्या कडकडाटात दाद दिली. संस्थेच्या अध्यक्षा रोशनी सुनील भोसले आणि प्रमुख मार्गदर्शिका मालती चंद्रकांत जाधव यांच्या नेतृत्वाखाली हा उत्सव यशस्वीरीत्या पार पडला. नियोजनबद्ध आयोजनामुळे कार्यक्रमाला शिस्तबद्ध व प्रेरणादायी स्वरूप लाभले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

LPG वर संकट की दिलासा? होर्मुझ तणावातही सरकारचं मोठं आश्वासन; तुमच्या घरच्या गॅसबद्दल जाणून घ्या सत्य!

MI vs PBKS Live: आई, शप्पथsss...! श्रेयस अय्यरचा अविश्वसनीय झेल पाहून रोहित शर्मा अवाक्... सूर्याचे डोळे विस्फारले... IPL2026 मधील बेस्ट कॅच

Latest Marathi News Live Update : जेव्हा कधी काहीतरी चांगले घडते, तेव्हा विरोधक तक्रारी करतातच, नारी शक्ती वंदन विधेयकावर कंगना रानौत यांची प्रतिक्रिया

MI vs PBKS Live: क्विंटन डी कॉकचे शतक, मोडला MS Dhoni चा विक्रम! युझवेंद्र चहलची एक चूक अन् पंजाब किंग्सच्या मेहनतीवर पाणी

Aarey Milk: मुंबईकरांसाठी आनंदाची बातमी! ‘आरे’ दूध पुन्हा बाजारात येणार, तारीख आली समोर, स्टॉलधारकांना दिलासा

SCROLL FOR NEXT