रुग्णांच्या सुरक्षिततेचा मुद्दा ऐरणीवर
राजावाडी रुग्णालय येथे विरोधी पक्षनेत्या किशोरी पेडणेकर यांची पाहणी
घाटकोपर, ता. २४ (बातमीदार) : घाटकोपर येथील राजावाडी रुग्णालय येथे भेट दिल्यानंतर पालिकेच्या विरोधी पक्षनेत्या किशोरी पेडणेकर यांनी रुग्णालयातील सुरक्षाव्यवस्था आणि आरोग्य खात्याच्या खर्चाबाबत प्रश्न उपस्थित केले.
डॉक्टर आणि परिचारिका चांगल्या पद्धतीने कार्यरत असल्याचे नमूद करीत त्यांनी त्यांच्या सेवाभावाचे कौतुक केले. मात्र रुग्ण आणि त्यांच्या नातेवाइकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने आवश्यक ती उपाययोजना अपुरी असल्याचे त्यांनी सांगितले. सुरक्षा रक्षकांची संख्या वाढवणे अत्यावश्यक आहे, असेही त्यांनी म्हटले.
रुग्णांची हेळसांड होऊ नये यासाठी रुग्णालय अधिक सुसज्ज आणि सक्षम असणे गरजेचे असल्याचेही त्यांनी नमूद केले. तसेच आरोग्य खात्यावर होणाऱ्या खर्चाबाबत पारदर्शकता राखावी, अशी मागणी त्यांनी केली.
महापालिका रुग्णालयांच्या खासगीकरणाच्या शक्यतेवर बोलताना पेडणेकर म्हणाल्या, की पालिका रुग्णालयांचे पूर्ण खासगीकरण होता कामा नये. खासगीसारख्या सुविधा देण्याचा प्रयत्न असला तरी संपूर्ण खासगीकरणाला आमचा ठाम विरोध राहील.
सरकारकडून काही योजना बंद करण्यात आल्याच्या मुद्द्यावर त्यांनी सत्ताधाऱ्यांवर टीका करीत योजना सुरू करून नंतर मागे घेणे योग्य नाही. त्याबाबत स्पष्ट उत्तर द्यावे, असा टोला लगावला. दरम्यान, मासेविक्रेत्यांच्या मुद्द्यावर बोलताना त्यांनी नागरिकांना सावधगिरी बाळगण्याचे आवाहन केले. मासे खरेदी करताना दर्जा तपासून घ्यावा. स्वस्ताच्या मोहाला बळी पडू नये. नागरिकांच्या आरोग्याशी तडजोड होता कामा नये, असे त्यांनी सांगितले. या भेटीनंतर रुग्णालयातील सुविधा, सुरक्षा आणि प्रशासनाबाबत पुन्हा चर्चा रंगण्याची शक्यता व्यक्त होत आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.